हिंगोली तहसीलवर भाजपाचा मोर्चा

By Admin | Published: July 16, 2014 11:59 PM2014-07-16T23:59:26+5:302014-07-17T00:27:57+5:30

हिंगोली : भारतीय जनता पार्टीच्या वतीने विविध मागण्यांसाठी बुधवारी हिंगोली तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

BJP's front at Hingoli tehsil | हिंगोली तहसीलवर भाजपाचा मोर्चा

हिंगोली तहसीलवर भाजपाचा मोर्चा

googlenewsNext

हिंगोली : भारतीय जनता पार्टीच्या वतीने विविध मागण्यांसाठी बुधवारी हिंगोली तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
हिंगोलीतील गांधी चौक येथून सकाळी ११.३० च्या सुमारास भाजपाच्या वतीने मोर्चाला सुरूवात करण्यात आली. त्यानंतर जवाहर रोड मार्गे हा मोर्चा तहसील कार्यालयावर दाखल झाला. तहसील प्रशासनास जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, वीज बिलावरील व्याज माफ करावे, ६० वर्षावरील शेतकऱ्यांना पेन्शन योजना लागू करावी, गारपिटग्रस्त शेतकऱ्यांचे पुर्नसर्व्हेक्षण करावे, दुबार पेरणीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी आदींच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष बाबाराव बांगर, तान्हाजी मुटकुळे, अ‍ॅड. प्रभाकर भाकरे, डॉ. पुंजाजी गाडे, डॉ. राजेश भोसले, यशोदा कोरडे, दुर्गादास साकळे, फुलाजी शिंदे, संजय ढोके, बाबा घुगे, संजय टेकाळे, माणिक लोंढे, सुधाकर पाटील, बी. डी. बांगर, संतोष वाकडे, कैलास खर्जूले, दत्तराव वाबळे, मनोज जैन उपस्थित होते.
(जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: BJP's front at Hingoli tehsil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.