फुलंब्रीत सरळ लढतीत भाजपाची हॅटट्रिक; मतदारसंघाला मिळाल्या पहिल्या महिला आमदार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2024 06:14 PM2024-11-24T18:14:46+5:302024-11-24T18:15:19+5:30
फुलंब्री मतदारसंघात मागील २० वर्षांपासून काँग्रेस-भाजपाच्या उमेदवारात सरळ लढत होत होती. यात हरिभाऊ बागडे व डॉ. कल्याण काळे हेच समोरासमोर उभे होते.
फुलंब्री : फुलंब्री विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या उमेदवार अनुराधा चव्हाण यांनी काँग्रेसचे उमेदवार विलास औताडे यांचा ३२ हजार मतांनी पराभव करून मतदारसंघाच्या पहिल्या महिला आमदार होण्याचा मान मिळविला. तसेच भाजपाने या माध्यमातून विजयाची हॅटट्रिक केली.
फुलंब्री मतदारसंघात मागील २० वर्षांपासून काँग्रेस-भाजपाच्या उमेदवारात सरळ लढत होत होती. यात हरिभाऊ बागडे व डॉ. कल्याण काळे हेच समोरासमोर उभे होते. पण, यंदाच्या निवडणुकीत हे दोन्ही नेते निवडणूक रिंगणाबाहेर असल्याने भाजपाच्या वतीने अनुराधा चव्हाण यांनी तर, काँग्रेसच्या वतीने विलास औताडे यांनी निवडणूक लढविली. निवडणूक प्रचारादरम्यान शिंदे सेनेचे बंडखोर रमेश पवार यांच्या नावाची चर्चा अधिक झाली. परंतु निकालात पवार यांना मतदारांनी फारसा थारा दिला नाही. त्यामुळे काँग्रेस व भाजपातच सरळ लढत झाली. निवडणूक प्रचारात भाजपाने विकासाचे मुद्दे उपस्थित केले. यात राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या कार्यकाळातील कामे आणि अनुराधा चव्हाण यांनी जि.प. सभापती असताना व बाजार समितीच्या सभापती असताना केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडला. दुसरीकडे काँग्रेसचे विलास औताडे यांनी विकास कामांऐवजी भाजपावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. ही बाब मतदारांना पटली नाही. त्यामुळे मतदारांनी भाजपाला साथ दिली. तसेच लाडक्या बहिणींनी भरभरून आशीर्वाद दिले.
फुलंब्री उमेदवारनिहाय मतदान
उमेदवाराचे नाव पक्ष मिळालेली मते
अनुराधा अतुल चव्हाण- भाजपा- १,३४,०६५
विलास केशवराव औताडे- काँग्रेस- १,०२,५७२
रमेश देविदास पवार-अपक्ष-१३,०१०
वंचित बहुजन आघाडी- महेश निनाळे-६,१७०
अमोल रमेश पवार- बहुजन समाज पार्टी- १,५३१
बलासाहेब तातेराव पाथ्रीकर- मनसे-८४३
डॉ. कैलाशचंद्र जनार्दन बनसोडे- विदुलथाई चीरुथगल काटची-२५६
चंद्रकांत दामोदर रुपेकर-रिपब्लिकन सेना-७४०
दिनकर भीमराव खरात- आझाद समाज पार्टी-६३६
रमेश एकनाथ काटकर- राष्ट्रीय समाज पार्टी- १,११५
रमेश उत्तम वानखडे-ओळ इंडिया फोरवर्ड ब्लॉक-१०७
सुनील दिलीप साळवे-पीपल्स पार्टी ऑफ इंडिया-१८२
अनिसखां हबीबखां पठाण- अपक्ष-२१४
अब्दुल हनीफ नाईकवाडी- अपक्ष-६७५
ॲड. अंजली साबळे- अपक्ष-३९२
मारोती दशरथ कांबळे- अपक्ष- ३००
जगन्नाथ गावनाजी काळे- अपक्ष- ९३५
तौफिक रफिक अहेमद- अपक्ष- ९६८
नयुम शेख- अपक्ष- ३७५
मंगेश साबळे- अपक्ष- १३७७
राहुल नारायण भोसले- अपक्ष- २२३
लक्ष्मण एकनाथ गिरी- अपक्ष- १६९
लक्ष्मण सोनाजी कांबळे- अपक्ष- १४९
विशाल कडूबा पाखरे- अपक्ष- १४३
सय्यद हरून गफूर- अपक्ष- ३००
सलीम शहा भिकन शहा- अपक्ष- १८५
संजय बाबुराव चव्हाण- अपक्ष- १७८
नोटा: ९२८
एकूण मते २,६९,७८५
यात टपाली मतदानाचा समावेश आहे.