भाजपच्या यादीला ‘स्थायी’त विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 01:28 AM2017-08-24T01:28:20+5:302017-08-24T01:28:20+5:30
राज्य शासनाने दिलेल्या १०० कोटी रुपयांच्या निधीतून करण्यात येणाºया ३१ रस्त्यांची यादी बुधवारी प्रशासनाने जाहीर केली़ ती यादी मनमानी असल्याचा आरोप करून सदस्यांनी स्थायी समिती बैठक तापविली
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : राज्य शासनाने दिलेल्या १०० कोटी रुपयांच्या निधीतून करण्यात येणाºया ३१ रस्त्यांची यादी बुधवारी प्रशासनाने जाहीर केली़ ती यादी मनमानी असल्याचा आरोप करून सदस्यांनी स्थायी समिती बैठक तापविली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, महापौर भगवान घडामोडे यांना सदस्यांच्या मतांची माहिती पत्राद्वारे देण्यात येईल, असे सभापती गजानन बारवाल यांनी सदस्यांना सांगितले. मनपा आयुक्तांनी जाहीर केलेल्या रस्त्यांची स्वत: पाहणी करावी आणि नंतर नव्याने रस्त्यांची यादी तयार करावी, असे आदेशही त्यांनी दिले.
बैठकीच्या सुरुवातीलाच सदस्य राजू वैद्य यांनी रस्त्यांच्या यादीवर चर्चेची मागणी केली़ वैद्य म्हणाले, शासनाने १०० कोटी रुपये दिले़ यातून करण्यात येणाºया रस्त्यांची यादी तीन वेळा तयार केली़ तीन याद्या कोणी तयार केल्या आणि कोणत्या यादीनुसार प्रत्यक्षात काम होणार याचा खुलासा झाला पाहिजे.
राजगौरव वानखेडे यांनी ३१ रस्त्यांच्या यादीवर आक्षेप घेतला. १० रस्ते अजून १० वर्षे करायची गरज नाही, मग त्यांचा यादीत समावेश का केला, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला़ रस्त्यांच्या यादीची तपासणी करा, भूमिगत व आधीच्या २४ कोटींतील रस्त्यांप्रमाणे १०० कोटींची अवस्था होऊ नये याची दक्षता घ्या़ प्रत्येक रस्त्यासाठी स्वतंत्र निविदा काढा, अन्यथा १०० कोटींचे रस्ते व्हायला १० वर्षे लागतील, असा सूर इतर सदस्यांनी आळविला. सर्व सदस्यांनी सर्वेक्षण करून नव्याने यादी तयार करण्याची मागणी केली़
दरम्यान गणेश विसर्जन मार्गावर तातडीने पॅचवर्क करण्याची मागणी स्वाती नागरे, कीर्ती शिंदे या सदस्यांनी केली. कार्यकारी अभियंता सिकंदर अली यांनी पॅचवर्क सुरू असल्याचे सांगितले. एम-२, एन-९ भागात पॅचवर्क सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. त्यावर नागरे, शिंदे यांनी आक्षेप घेतला. सभापती बारवाल यांनी तातडीने पॅचवर्कचे आदेश दिले.