भाजपचा ‘दिवार’वर पॉलिटिकल प्रचार; डिजिटल काळात पारंपरिकेवर भर
By विकास राऊत | Published: January 18, 2024 06:21 PM2024-01-18T18:21:12+5:302024-01-18T18:21:20+5:30
भाजपा प्रचारासाठी सार्वजनिक ठिकाणच्या भिंती रंगविणार
छत्रपती संभाजीनगर : डिजिटल इंडियाचा नारा देणाऱ्या भाजपने चक्क पारंपरिकेतवर भर देत शहरात सार्वजनिक ठिकाणच्या भिंती रंगवून लोकसभा निवडणुकीसाठी वातावरणनिर्मिती सुरू केली आहे. भाजपने ‘दिवार’ वर पॉलिटिकल प्रचार हे अभियान हाती घेतले असून शहरातील काही भागांमध्ये ‘दिवार’ लेखनास शहरात सुरुवात केली. सोबतच मंदिर स्वच्छता अभियानही राबविले.
शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांच्या उपस्थितीत ‘दिवार’ लेखन व मंदिर स्वच्छता अभियानाला बुधवारी सुरुवात झाली. अभियानांतर्गत पूर्व मतदारसंघातील एन-४, पश्चिम मतदारसंघातील जवाहर कॉलनी येथे ‘पुन्हा एकदा मोदी सरकार’ असे घोषवाक्य लिहीत बोराळकर यांच्या उपस्थितीत अभियान सुरू करण्यात आले. जवाहर कॉलनी येथील संकटमोचन हनुमान मंदिर व शिवशंकर कॉलनी येथील शिव हनुमान मंदिरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
काही स्वस्त धान्य दुकानांतून मोफत धान्य वाटप बायोमेट्रिक सिस्टीमची पाहणी या अभियानांतर्गत करण्यात आली. संकटमोचन हनुमान मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सुरेंद्र शेवतेकर, अजय बेलसरे, सरचिटणीस जालिंदर शेंडगे, राजेंद्र साबळे, दीपक ढाकणे, लक्ष्मीकांत थेटे, संजय जोरले, शंकर म्हात्रे, विवेक राठोड यांच्यासह भाजप पदाधिकारी, परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती.