भाजपच्या प्रशांत बंब यांचा विजयाचा चौकार; गंगापूरमधून सलग चौथ्यांदा विजयी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 15:36 IST2024-11-23T15:36:15+5:302024-11-23T15:36:42+5:30
अंतिम 27व्या फेरीनंतर आमदार प्रशांत बंब 5909 मतांनी विजयी झाले.

भाजपच्या प्रशांत बंब यांचा विजयाचा चौकार; गंगापूरमधून सलग चौथ्यांदा विजयी...
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर मतदारसंघात अतिशय चुरशीच्या लढतीत भाजपचे प्रशांत बंब विजयी झाले आहेत. त्यांच्याविरोधात शरद पवार गटाच्या सतीच चव्हाण यांचे आव्हान होते. बंब आणि चव्हा यांच्यात सुरुवातीपासून अतिशय अटीतटीची लढत सुरू होती. कधी बंब पुढे जात होते, तर कधी चव्हाण पुढे जात होते. विशेष म्हणजे, सतीश चव्हाण यांना जरांगे फॅक्टरचा फायदा होईल, अशी शक्यताही वर्तवली जात होती.
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा फटका मराठवाड्यातील भाजपच्या उमेदवारांना बसणार, अशी शक्यता वर्तवली जात होती. मराठवाडा सोडा, संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही जरांगे फॅक्टरचा परिणाण जाणवला नाही. राज्यभरात महायुतीने 225+ जागांवर आघाडी घेतली असून, भाजप 130+, शिंदेसेना 55+ आणि अजित पवार गट 39+ जागांवर आघाडीवर आहे. यातील बहुतांश जागांचे निकालही हाती आले आहेत.
गंगापूर मतदारसंघात भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी विजयाचा चौकार लगावला आहे. त्यांनी आपले प्रतिस्पर्धी शरद पवार गटाचे सतीश चव्हाण अंतिम 27व्या फेरीत 5909 मतांनी पराभव केला आहे. हा विजय प्रशांत बंब यांच्यासाठी फार महत्वाचा होता. कारण, मतदानापूर्वी जरांगे फॅक्टरमुळे त्यांचा पराभव होणार, अशी शक्यता वर्तवली जात होती. पण, आता त्यांनी शेवटच्या फेरीत आघाडी घेत सलग चौथा विजय मिळवला आहे.