लोकसभेसाठी भाजपची व्यूहरचना; जे. पी. नड्डांच्या उपस्थितीत आज औरंगाबादेत शक्तिप्रदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2023 12:16 PM2023-01-02T12:16:06+5:302023-01-02T12:16:25+5:30

मराठवाड्यात औरंगाबादसह हिंगोली, परभणी आणि उस्मानाबाद लोकसभा लढवण्यासाठी भाजप पूर्णपणे संघटनात्मक तयारी करीत आहे.

BJP's strategy for Lok Sabha; J. P. Today in Aurangabad in the presence of Nadda Shakti | लोकसभेसाठी भाजपची व्यूहरचना; जे. पी. नड्डांच्या उपस्थितीत आज औरंगाबादेत शक्तिप्रदर्शन

लोकसभेसाठी भाजपची व्यूहरचना; जे. पी. नड्डांच्या उपस्थितीत आज औरंगाबादेत शक्तिप्रदर्शन

googlenewsNext

औरंगाबाद : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची सोमवारी (दि. २ जानेवारी) मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर सायंकाळी ५.३० वाजता सभा होणार असून, भाजप लोकसभा निवडणुकीचे रणशिंग औरंगाबादेतून फुंकणार आहे. सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, सहकार मंत्री अतुल सावे यांच्यासह प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे, आ. हरिभाऊ बागडे, आ. प्रशांत बंब, माजी आ. पंकजा मुंडे, प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर, शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांची उपस्थिती असेल.

अध्यक्ष नड्डा दि. २ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता वेरूळ घृष्णेश्वर मंदिरात दर्शनाला जातील. त्यांच्या हस्ते वेरूळ येथील अहिल्यादेवी कुंडाच्या सौंदर्यीकरणाचा व साउंड व लाईट शोच्या कामाचे भूमिपूजन होणार आहे. तेथून ते सभेसाठी शहरात येतील. सभेनंतर वैजापूर, कन्नड, गंगापूर व शहरातील तीन अशा सहा मतदारसंघांतील भाजप कोअर कमिटीची ते बैठक घेतील. नंतर शहरातील काही महत्त्वाच्या नागरिकांशी ते चर्चा करतील. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ भाजप लढणार असून, सभेला सहा विधानसभा मतदारसंघांतील पदाधिकारी, कार्यकर्ते, भाजपप्रेमी, नागरिक उपस्थित राहतील, अशा व्यवस्था केली आहे. दरम्यान, रविवारी सायंकाळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. कराड, सहकार मंत्री सावे, शहराध्यक्ष बोराळकर यांनी सभेच्या पूर्वतयारीचा, आसनव्यवस्था, स्टेजचा आढावा घेतला.

लोकसभेसाठी तयारी
देशातील १४४ लोकसभा मतदारसंघांवर विशेष लक्ष देण्यात येत आहे. राज्यात शिवसेनेकडे असलेल्या १८ जागांसाठी भाजप व्यूहरचना आखत आहे. देशात भाजपने ४०० जागा लढविण्याचा निश्चय केला आहे. त्याचे नियोजन म्हणून अनेक केंद्रीय मंत्र्यांना विविध लोकसभा मतदारसंघ संघटनात्मक मजबुती करण्यासाठी वाटून दिले आहेत. मराठवाड्यात औरंगाबादसह हिंगोली, परभणी आणि उस्मानाबाद लोकसभा लढवण्यासाठी भाजप पूर्णपणे संघटनात्मक तयारी करीत आहे.

Web Title: BJP's strategy for Lok Sabha; J. P. Today in Aurangabad in the presence of Nadda Shakti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.