कन्नड पंचायत समितीच्या उपसभापतीपदी भाजपचे सुनिल निकम बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2021 17:11 IST2021-08-05T17:11:18+5:302021-08-05T17:11:46+5:30
भाजपचे सुनील निकम यांचे एकमेव नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आले होते.

कन्नड पंचायत समितीच्या उपसभापतीपदी भाजपचे सुनिल निकम बिनविरोध
कन्नड ( औरंगाबाद ) : येथील पंचायत समितीच्या उपसभापतीपदी भाजपचे सुनिल निकम यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. डॉ नयना तायडे यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते.
पंचायत समिती सभागृहात गुरूवारी सदस्यांची विशेष बैठक अध्यासी अधिकारी जनार्दन विधाते यांनी बोलावली होती. उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी भाजपचे सुनील निकम यांचे एकमेव नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आले होते. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर सर्व प्रक्रिया पार पडून निकम यांना बिनविरोध विजयी घोषित करण्यात आले. तहसिलदार संजय वारकड, बीडीओ प्रविण सुरडकर यांची यावेळी उपस्थिती होती.
निवडणुक प्रक्रिया पार पडल्यानंतर कृउबा समिती सभापती प्रकाश घुले, पं.स.सभापती आप्पाराव घुगे, भाजपचे जिल्हाउपाध्यक्ष संजय खंबायते, सरचिटणीस डॉ संजय गव्हाणे, तालुकाध्यक्ष भगवान कोल्हे, अनु.जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष राजेंद्र गव्हाणे, जि.प.सदस्य किशोर पवार, सुरेश गुजराने, शेरोडीचे सरपंच जयेश बोरसे, आडगावचे सरपंच ज्ञानेश्वर निकम, कृउबा समितीचे माजी उपसभापती गणेश शिंदे आदींनी सुनिल निकम यांचा सत्कार केला.