काळ्या बाजारात जाणारा गहू पकडला

By Admin | Published: June 13, 2014 11:43 PM2014-06-13T23:43:07+5:302014-06-14T01:19:29+5:30

पूर्णा : स्वस्त धान्य दुकानातील गहू काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जाताना ट्रकसह पूर्णा पोलिसांनी गहू जप्त केला. यामुळे स्वस्त धान्य दुकानदार व व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

Black carries wheat in black market | काळ्या बाजारात जाणारा गहू पकडला

काळ्या बाजारात जाणारा गहू पकडला

googlenewsNext

पूर्णा : स्वस्त धान्य दुकानातील गहू काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जाताना ट्रकसह पूर्णा पोलिसांनी गहू जप्त केला. यामुळे स्वस्त धान्य दुकानदार व व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
याविषयी माहिती अशी की, १३ व १४ जूनच्या मध्यरात्री १२ ते १ वाजण्याच्या सुमारास कृषी उत्पन्न बाजार समितीचे परिसरातील एका गोदामात ट्रकमध्ये (क्रमांक एम.एच. २६-एच.७१६२) भरलेला १३९ पोते गहू तसेच एक आॅटो (क्रमांक एम.एच.२२-ए.ए.१८२४) आढळून आले. ट्रक व पियाजो आॅटो यासह ४३ हजार ८३० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. आरोपींनी संगनमत करून शासनाच्या सार्वजनिक वितरणातील रेशनचा गहू बेकायदेशीरित्या खरेदी करून स्वत:च्या फायद्यासाठी काळ्या बाजारात विक्री करण्याच्या उद्देशाने नेण्यात येत होता. शासकीय गोदामातील रेकॉर्डमध्ये फेरबदल करून सदरील गहू ट्रकमध्ये भरीत असताना पोलिसांनी पकडून जप्त केला. या प्रकरणी शिकाऊ फौजदार राहूल बहुळे यांच्या फिर्यादीवरून ट्रकचालक फरहान चाऊस, बाजारीव श्रीपत शिंदे, दत्ता कदम, संतोष कदम, विक्रम कदम, विकास कदम या सहा आरोपींविरुद्ध पूर्णा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस उपअधीक्षक विश्वनाथ जटाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. (वार्ताहर)

Web Title: Black carries wheat in black market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.