बंडखोर संदीपान भुमरे यांच्या बॅनरला फासले काळे; कार्यालयाबाहेरील पोलीस बंदोबस्त वाढवला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2022 11:51 AM2022-06-25T11:51:28+5:302022-06-25T11:51:51+5:30

गुवाहाटी येथे गेलेल्या आमदारांमध्ये औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यातील तब्बल ५ आमदारांचा समावेश आहे. त्यामुळे या आमदारांच्या घरांना पोलीस संरक्षण देण्यात आले आहे.

black ink thrown on Shiv Sena Rebel Sandipan Bhumare's banner in Aurangabad; Police stepped up security outside the office | बंडखोर संदीपान भुमरे यांच्या बॅनरला फासले काळे; कार्यालयाबाहेरील पोलीस बंदोबस्त वाढवला

बंडखोर संदीपान भुमरे यांच्या बॅनरला फासले काळे; कार्यालयाबाहेरील पोलीस बंदोबस्त वाढवला

googlenewsNext

औरंगाबाद : राज्याचे रोहयोमंत्री संदीपान भुमरे यांच्या गारखेडा परिसरातील विभागीय क्रीडा संकुलाजवळ असलेल्या संपर्क कार्यालयाबाहेरील बॅनरला शुक्रवारी रात्री ११.३० वाजता दोन व्यक्तीनी काळे फासले. दरम्यान, आज सकाळपासून पोलिसांचा मोठा बंदोबस्त कार्य्लायाबाहेर तैनात करण्यात आला आहे. 

बंडखोरी करणाऱ्या आमदारांच्या घरावर, संपर्क कार्यालयांवर राज्यभरात आंदोलने, तोडफोड शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. शहरातील गारखेडा परिसरात मंत्री भुमरे यांचे विभागीय कार्यालय आहे. या कार्यालयाच्या बाहेर मोठे बॅनर लावलेले आहे. या बॅनरवरील मंत्री भुमरे यांच्याच छायाचित्राला रात्री ११.३० वाजता विना नंबरच्या दुचाकीने आलेल्या दोन तरुणांनी काळे फासले. तरुणांच्या तोंडाला रुमाल बांधलेला असल्यामुळे ओळखू आले नसल्याचे कार्यालयाच्या बाहेरील सुरक्षारक्षकाने सांगितले. या सुरक्षारक्षकाने काही वेळातच बॅनरवर टाकलेला काळा रंग पाण्याने धुऊन काढला.

पोलिसांची घटनास्थळी धाव
गुवाहाटी येथे गेलेल्या आमदारांमध्ये औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यातील तब्बल ५ आमदारांचा समावेश आहे. त्यामुळे या आमदारांच्या घरांना पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. कार्यालयाबाहेरही गस्त वाढविली आहे. मंत्री भुमरे यांच्या बॅनरला काळे फासल्याची माहिती समजल्यावर जवाहरनगरचे उपनिरीक्षक शिवाजी घोरपडे सहकाऱ्यांसह घटनास्थळी तत्काळ दाखल झाले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही घटनेचा आढावा घेतला.

Web Title: black ink thrown on Shiv Sena Rebel Sandipan Bhumare's banner in Aurangabad; Police stepped up security outside the office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.