ब्लॅकलिस्ट कंपनीला काम; मनपातर्फे चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2018 12:46 AM2018-08-15T00:46:20+5:302018-08-15T00:46:40+5:30
शहरातील ३०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे काम मिळविलेल्या मायोवेसल कंपनीची महापालिका प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शहरातील ३०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे काम मिळविलेल्या मायोवेसल कंपनीची महापालिका प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे. कंपनीने मनपाकडे सादर केलेल्या प्रत्येक कागदाची आता शहानिशा करण्यात येणार असून, जोपर्यंत प्रशासनाचे समाधान होणार नाही, तोपर्यंत स्थायी समितीच्या मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविण्यात येणार नाही, अशी भूमिका प्रशासनाने घेतली आहे.
मायोवेसल या कंपनीला अमरावती महापालिकेत कत्तलखान्याच्या कामात ब्लॅकलिस्ट करण्यात आल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. चिकलठाणा आणि पडेगाव येथे दीडशे मेट्रिक टनचे दोन कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. प्रकल्पासाठी लागणा-या शेडच्या उभारणीचे काम महापालिकेने स्थानिक कंपनीला दिले आहे.