शरीरसंबंधाचे चित्रीकरण केलेल्या टोळीकडून ब्लॅकमेलिंग : त्रासाने युवकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:05 AM2021-06-25T04:05:52+5:302021-06-25T04:05:52+5:30
करमाड : शरीरसंबंधाचे चित्रीकरण करून पैसे उकळणे तसेच सततच्या ब्लॅकमेलिंगच्या त्रासाला कंटाळून कुंभेफळच्या युवकाने अखेर आत्महत्या केली. या प्रकरणी ...
करमाड : शरीरसंबंधाचे चित्रीकरण करून पैसे उकळणे तसेच सततच्या ब्लॅकमेलिंगच्या त्रासाला कंटाळून कुंभेफळच्या युवकाने अखेर आत्महत्या केली. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून, २८ जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
जितेंद्र सिंग बाबूलाल सिंग असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. बुधवारी सकाळी सिंग याने विषारी बिया खाल्ल्याने त्यास शहरातील खाजगी दवाखान्यात दाखल केले होते. करमाड पोलिसांनी घेतलेल्या जबाबात त्याने म्हटले की, अरुण सूर्यवंशी व अन्य त्याचा दुसरा मित्र दिलीप जाधव या दोघांनी मुलगी शरीरसंबंधासाठी उपलब्ध करून देतो, असे सांगून त्या मुलीशी शरीरसंबंध करतानाचे फोटो व व्हिडिओ काढून त्याबद्दल त्याला ब्लॅकमेल करून ४६ हजार रुपये उकळले. परंतु त्यांचे त्यावर समाधान झाले नाही, तर पुन्हा ३ लाख रुपयांची मागणी केली. त्रासाला कंटाळून सिंग याने आत्महत्येचा प्रयत्न केला. बुधवारी रात्री उपचारादरम्यान खाजगी दवाखान्यात सिंगचा मृत्यू झाला. कटात सहभागी योगेश नाडे (रा. औरंगाबाद) व इतर साथीदार यांच्या साहाय्याने प्लॅन करून याबाबत व्हिडिओ शूटिंग करून खंडणी मागण्याचा प्रकार निष्पन्न झाला. गुन्ह्यात तिघांनाही उपनिरीक्षक नागलोत, पोहेकॉ संतोष पाटील, पोलीस नाईक अनिल गायकवाड, संदीप जाधव, आनंद घाटेश्वर, एन. धोंडकर यांच्या पथकाने अटक केली.
चौकट...
टोळीने किती जणांना फसविले...
या टोळीने अशा प्रकारे किती जणांना फसवून खंडणी वसूल केली, या प्रकरणी करमाड पोलीस शोध घेत असून, गुन्ह्याचा तपास पोलीस उप निरीक्षक नागलोत करीत आहेत.