मुस्लीम युवामंचतर्फे आयोजित शिबिरात १७५ दात्यांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:04 AM2021-05-29T04:04:31+5:302021-05-29T04:04:31+5:30
पैठण शहरातील बागवान फंक्शन हॉल येथे शिबिराचे उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी गोरख भामरे यांच्या हस्ते करण्यात आले. तहसीलदार चंद्रकांत ...
पैठण शहरातील बागवान फंक्शन हॉल येथे शिबिराचे उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी गोरख भामरे यांच्या हस्ते करण्यात आले. तहसीलदार चंद्रकांत शेळके, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका संपर्क प्रमुख दत्तात्रय गोर्डे, जि.प. सदस्य विलास भुमरे, नामदेव खराद, नगरसेवक तुषार पाटील, सोमनाथ परळकर, बंडू आंधळे, मराठा महासंघाचे अतिश गायकवाड, डॉ.सचिन अवसरमल यांनी भेट देऊन संयोजकांना प्रोत्साहन दिले. घाटी रक्तपेढीचे डॉ.अश्विनी तांगडे, रक्त संक्रमण अधिकारी डॉ.हेमाली गोसावी, डॉ.प्रिया पवार, हनुमान रुळे यांच्यासह इम्रान अंबेकर, अमजद खान, राजेंद्र लोखंडे, अली चाऊस, चांगदेव गायकवाड, प्रतीक्षा गायकवाड, स्नेहा अक्कावार आदींनी वैद्यकीय बाजू सांभाळली.
फोटो : मुस्लीम समाजाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराचा शुभारंभ प्रसंगी उपविभागीय अधिकारी गोरख भामरे, इरफान बागवान, काझी.
280521\img_20210528_185629_1.jpg
मुस्लिम समाजाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबीराचा शुभारंभ प्रसंगी उपविभागीय अधिकारी गोरख भामरे, इरफान बागवान, काझी.