बाळकृष्ण इंडस्ट्रीजमध्ये रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2020 07:26 AM2020-11-12T07:26:16+5:302020-11-12T07:26:16+5:30
औरंगाबाद : वाळूंज एमआयडीसीतील बाळकृष्ण इंडस्ट्रीजमध्ये आयोजित रक्तदान शिबिरात २०० पेक्षा अधिक लोकांनी रक्तदान केले. कंपनीच्या वतीने सातत्याने सामाजिक ...
औरंगाबाद : वाळूंज एमआयडीसीतील बाळकृष्ण इंडस्ट्रीजमध्ये आयोजित रक्तदान शिबिरात २०० पेक्षा अधिक लोकांनी रक्तदान केले.
कंपनीच्या वतीने सातत्याने सामाजिक उपक्रम राबविले जात आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अरविंद पोद्दार यांचा ६७ वा वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर ६ नोव्हेंबर रोजी घेण्यात आले. या शिबिराचे उदघाटन युनिट हेड के. वेंकटरमन यांनी केले. यावेळी अजय गुप्ता, व्ही. एम. पाठक, गणेश धामोडे, बी. एस. पाठक, आर.के.कुलकर्णी, मुकेश गुप्ता, बलराम खैरे, कामगार संघटनेचे अध्यक्ष के. सी. जाधव आदींची उपस्थिती होती. मागील १३ वर्षांपासून कंपनीचे व्यवस्थाकीय संचालक पोद्दार यांचा वाढ दिवशी रक्तदान शिबिर घेतले जाते. वैद्यकीय रुग्णालयातील रक्तपिढीच्या वतीने रक्त संकलन करण्यात आले.
चौकट
बाळकृष्ण इंडस्ट्रीजमध्ये आयोजित रक्तदान शिबिराचे उदघाटन करताना युनिट हेड के. वेंकटरमन व आदी.