रांजणगावात रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:05 AM2021-01-15T04:05:17+5:302021-01-15T04:05:17+5:30

इंदिरानगरात उघडा ढापा वाळूज महानगर : पंढरपुरातील इंदिरानगरात ड्रेनेजलाईनचा ढापा उघडा पडल्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. या वसाहतीत ये-जा ...

Blood donation camp at Ranjangaon | रांजणगावात रक्तदान शिबिर

रांजणगावात रक्तदान शिबिर

googlenewsNext

इंदिरानगरात उघडा ढापा

वाळूज महानगर : पंढरपुरातील इंदिरानगरात ड्रेनेजलाईनचा ढापा उघडा पडल्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. या वसाहतीत ये-जा करणाऱ्या मुख्य रस्त्यावरील या उघड्या ढाप्यात लहान मुले पडण्याचा धोका बळावला आहे. या धोकादायक ढाप्याविषयी ग्रामपंचायतीकडे तक्रार करुरूही दखल घेतली जात नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.

विटावा फाट्यावर दारू पकडली

वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसी परिसरातील विटावा फाट्यावर पोलिसांनी छापा मारून तीन हजार १२० रुपयांची दारू पकडली. या ठिकाणी अवैधरीत्या देशी दारूची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथकाने बुधवारी दुपारी ११.३० वाजेच्या सुमारास छापा टाकून उमेश पवार (रा. विटावा) यास ताब्यात घेतले. त्याच्याजवळ ६० देशी दारूच्या बाटल्या मिळून आल्या.

वाळूजला प्रचाराचे फलक हटविले

वाळूज महानगर : ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार संपताच वाळूजला विविध चौकांत लावण्यात आलेले प्रचाराचे फलक बुधवारी रात्री पोलिसांनी हटविले. येथील रामराई टी पाईंट, ट्रक टर्मिनल, लांझी चौक, बाजारतळ परिसर, आदी ठिकाणी अनेक उमेदवारांचे प्रचारार्थ फलक लावले होते. बुधवारी सायंकाळी प्रचार थंडावताच पोलिसांनी ग्रामपंचायतीच्या मदतीने हे फलक काढून टाकले.

सुंदर कॉलनीत अस्वच्छता

वाळूज महानगर : जोगेश्वरी ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या सुंदर कॉलनी या कामगार वसाहतीत कचरा साचला आहे. या वसाहतीत साफसफाईकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष असल्याने सर्वत्र अस्वच्छता पसरली असून, नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. या भागात स्वच्छता अभियान राबविण्यात यावे, यासाठी ग्रामपंचायतीकडे तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याची ओरड त्रस्त नागरिकांतून केली जात आहे.

लोकमान्य चौकात अतिक्रमण वाढले

वाळूज महानगर : बजाजनगरातील लोकमान्य चौकात अतिक्रमणे वाढल्यामुळे ये-जा करणाऱ्या नागरिक व वाहनधारकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या चौकात हातगाडीवर व्यवसाय करणारे तसेच फळ विक्रेत्यांनी रस्त्याच्या कडेला व्यवसाय थाटले आहेत. या अतिक्रमणामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत असून, सतत वाहतूक कोंडी होत आहे. या अतिक्रमणधारकांवर कारवाई करण्यास एमआयडीसी प्रशासन टाळाटाळ करीत असल्याने नागरिकांत नाराजीचा सूर उमटत आहे.

सिडको जलवाहिनी रस्त्याची दुरवस्था

वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगरातील जलवाहिनी रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. रात्रीच्यावेळी दुचाकीस्वारांना खड्डे दिसत नसल्याने किरकोळ स्वरूपाचे अपघातही होत आहे. या रस्त्यावरील गतिरोधक उखडल्याने ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना कसरत करीतच ये-जा करावी लागत आहे. या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी संजय पारखे, सुजय काळे, आदींनी केली आहे.

Web Title: Blood donation camp at Ranjangaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.