महायज्ञात नागरिकांसह डाॅक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:02 AM2021-07-05T04:02:11+5:302021-07-05T04:02:11+5:30

औरंगाबाद : स्वातंत्र्यसेनानी तथा ‘लोकमत’चे संस्थापक संपादक श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त ‘लोकमत रक्ताचं नातं’ या महारक्तदान ...

Blood donation of doctors, health workers along with well known citizens | महायज्ञात नागरिकांसह डाॅक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांचे रक्तदान

महायज्ञात नागरिकांसह डाॅक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांचे रक्तदान

googlenewsNext

औरंगाबाद : स्वातंत्र्यसेनानी तथा ‘लोकमत’चे संस्थापक संपादक श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त ‘लोकमत रक्ताचं नातं’ या महारक्तदान शिबिराचे रविवारी (दि. ४) युनायटेड सिग्मा हाॅस्पिटल येथे आयोजन करण्यात आले होते. डाॅक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्तदानाच्या महायज्ञात सहभाग नोंदविला.

युनायटेड सिग्मा हाॅस्पिटलचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक डाॅ. उन्मेष टाकळकर, संचालक डाॅ. मनीषा टाकळकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन झाले. याप्रसंगी लोकमतचे संपादक नंदकिशोर पाटील, वरिष्ठ महाव्यवस्थापक प्रवीण चोपडा, जाहिरात विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक अक्षय साहुजी, रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. अजय रोटे यांची प्रमुख उपस्थिती होती. शिबिराच्या यशस्वीतेसाठी रुग्णालयाचे संजय घाणेकर, धीरज तिवारी, सचिन पावडे, किशोर कुलकर्णी, सूर्यकांत दांडगे, ज्योती गवळी, गिरीश देशपांडे, रविना धोत्रे, ज्योती वखरे आदींनी परिश्रम घेतले.

शिबिरात अमृता ब्लड बँकेतर्फे रक्तसंकलन करण्यात आले. रक्तपेढीचे संतोष संगेवार, विशाल जैन, कोमल खंडागळे, अजय साळुंके, इम्रान शेख, डाॅ. किरण घोडके आदींनी त्यासाठी प्रयत्न केले.

-----

दुर्मिळ रक्तगट असलेल्या युवतीच्या रक्तदानाने सुरुवात

ओ निगेटिव्ह हा दुर्मिळ रक्तगट असलेली आयुषी खंडेलवाल या युवतीने सर्वप्रथम रक्तदान करून शिबिराची सुरुवात केली. रक्तदान करण्याची तिची ही दुसरी वेळ आहे. ‘लोकमत’मधून रक्तदानाविषयी माहिती मिळाली आणि आपण रक्तदानासाठी प्रेरित झाल्याचे आयुषी खंडेलवाल हिने सांगितले.

-----

यांनी केले रक्तदान

शिबिरात आयुषी खंडेलवाल, कैलास खंडेलवाल, अभिषेकसिंग दीक्षित, विश्वास चौधरी, पंजाब राठोड, राजेश पौळ, मनोज अजमेरा, स्नेहल गाडेकर, निरंजन पाटणकर, तुषार पठाडे, विठ्ठल उल्टे, प्रदीप दाभाडे, सुमीत साळवे, दीपक चोपडे, उदीत दिवे, अभिजित आडाव, साहील पोपळघट, गणेश वरहाडे, संदीप शिरसाठ, जितेंद्र जायगुडे, नितीन गडकर, फारुख उस्मान शाह, शिवकांता पांचाळ, डाॅ. प्रतीक पांडीकर, राम सरनाईक, प्रणव कळवनकर, साहेबराव आंबोरे, भागवत आखाट, अनुपमा बनकर, अभिषेक यस्लोटे, ग्यानोबा सुवर्णकार, गिरीष देशपांडे, संदीप गिरी, विनोद वायाळ, किरण कांबळे, रवींद्र पाडमुख, विष्णू बावसकर, संतोष भालेराव, अविनाश खंडागळे, नितीन कागडा, सुरज गवळे, शुभम खेमचंद यांनी रक्तदान केले.

--------

Web Title: Blood donation of doctors, health workers along with well known citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.