रक्तदाते अक्षय बाहेती यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:04 AM2021-06-21T04:04:22+5:302021-06-21T04:04:22+5:30

औरंगाबाद: जागतिक रक्तदिनानिमित्त रक्तदाते ॲड.अक्षय बाहेती यांचा सत्कार करण्यात आला. वैयक्तिक पातळीवर बाहेती यांनी आजवर ४५ वेळा रक्तदान केले ...

Blood donor Akshay Baheti felicitated | रक्तदाते अक्षय बाहेती यांचा सत्कार

रक्तदाते अक्षय बाहेती यांचा सत्कार

googlenewsNext

औरंगाबाद: जागतिक रक्तदिनानिमित्त रक्तदाते ॲड.अक्षय बाहेती यांचा सत्कार करण्यात आला. वैयक्तिक पातळीवर बाहेती यांनी आजवर ४५ वेळा रक्तदान केले आहे. कोरोनाच्या काळात प्लाझ्मा डोनर शोधणे, रुग्णांना मदत करण्याचे कार्य त्यांनी केले. दत्ताजी भाले रक्तपेढी येथे झालेल्या या कार्यक्रमाला एफडीएचे सहआयुक्त संजय काळे, डॉ.मंजुषा कुलकर्णी, सुषमा डोंगराजकर, चंद्रकला अहिरे आदींची उपस्थिती होती.

मध्य मतदारसंघात ध्वजारोहण

औरंगाबाद : शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त मध्य मतदारसंघात छत्रपती संभाजी महाराज चौक, टी.व्ही. सेंटर येथे ध्वजारोहण करण्यात आले. आ.प्रदीप जैस्वाल, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, उपजिल्हाप्रमुख अनिल पोलकर, संदेश कवडे, राजू इंगळे, सचिन खैरे, रमेश इधाटे आदींची उपस्थिती होती.

मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम ठप्प

औरंगाबाद : मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम ठप्प पडले आहे. जयभवानीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत दोन्ही बाजूंनी सिमेंट रस्त्याचे काम पूर्ण झाले असून, त्यापुढील रस्त्याचे काम ठप्प आहे. पावसाळ्यात ते काम कसे होणार, असा प्रश्न आहे.

नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

औरंगाबाद : युवासेनेतर्फे कोरेाना संसर्गाबाबत ठिकठिकाणी जनजागृती करण्यात आली. क्रांतीचौक, सूतगिरणी चौक, कॅम्ब्रिज चौक, टीव्ही सेंटर, मुकुंदवाडी आदी ठिकाणी जनजागृती मोहीम राबविण्यात आली. जिल्हाप्रमुख हनुमान शिंदे, गणेश तेलोरे, अवधूत अंधारे, शेखर जाधव, अक्षय दाभाडे आदींनी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले.

आविष्कार कॉलनीत अभिवादन

औरंगाबाद : शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आविष्कार कॉलनीतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी आ.अंबादास दानवे, उपजिल्हाप्रमुख संतोष जेजूरकर, संघटक राजू वैद्य, शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी आदींची उपस्थिती होती.

Web Title: Blood donor Akshay Baheti felicitated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.