ममदापुरात वृद्धेचा गळा दाबून खून

By Admin | Published: June 13, 2014 11:54 PM2014-06-13T23:54:04+5:302014-06-14T01:19:56+5:30

ममदापूर पाटोदा: अंबाजोगाई तालुक्यातील ममदापूर पाटोदा येथील एका वृद्ध महिलेचा उसाच्या फडात गळा दाबून खून केल्याची घटना शुक्रवारी सकाळी नऊ

Blood in the middle of the stomach with blood pressure | ममदापुरात वृद्धेचा गळा दाबून खून

ममदापुरात वृद्धेचा गळा दाबून खून

googlenewsNext

ममदापूर पाटोदा: अंबाजोगाई तालुक्यातील ममदापूर पाटोदा येथील एका वृद्ध महिलेचा उसाच्या फडात गळा दाबून खून केल्याची घटना शुक्रवारी सकाळी नऊ ते दहा वाजण्याच्या दरम्यान घडली. या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनकरबाई तुकाराम नरारे (वय ६७) असे त्या मृत महिलेचे नाव असून ती ममदापूर पाटोदा येथील रहिवासी आहे. शुक्रवारी सकाळी आठ वाजता मनकरबाई या स्वत:च्या शेतामध्ये गेल्या होत्या. त्यावेळी कोणीतरी त्यांचा गळा दाबून खून केला. मनकरबाई कोठे गेल्या याचा शोध घेत असताना शेतातील उसाच्या फडात त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या कुटुंबियांनी पोलिसांना याची खबर दिली. पोलिसांनी पंचनामा करुन गळ्यावर हाताच्या खाणा-खुणा असल्याने त्यांच्या गळा दाबून खून केला असल्याचा संशय व्यक्त केला आहे.
रमाकांत नरारे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात व्यक्ती विरुद्ध अंबाजोगाई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पीएसआय बांड करीत आहे.(वार्ताहर)
अंबाजोगाई तालुक्यात थरार.
ग्रामीण ठाण्यात अज्ञात आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल.
खुनामागचे कारण गुलदस्त्यात.
खून करून मृतदेह फेकला उसाच्या फडात.
आरोपींचा पोलीस घेत आहेत शोध.

Web Title: Blood in the middle of the stomach with blood pressure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.