गल्लीतील वादातून रक्त सांडले; जुन्या वादातून तरुणाचा चाकूने भोसकून खून

By बापू सोळुंके | Published: June 3, 2023 03:23 PM2023-06-03T15:23:48+5:302023-06-03T15:24:56+5:30

आरोपी आणि मृत दोघेही एकाच गल्लीत राहतात

Blood spilled from street brawls; A young man was stabbed to death due to an old dispute | गल्लीतील वादातून रक्त सांडले; जुन्या वादातून तरुणाचा चाकूने भोसकून खून

गल्लीतील वादातून रक्त सांडले; जुन्या वादातून तरुणाचा चाकूने भोसकून खून

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर: येथील बेगमपुरा परिसरातील माळीवाडा येथे जुन्या वादातून एका तरुणाची चाकूने भोसकून निर्घृणपणे हत्या केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास घडली. याघटनेनंतर आरोपी पसार झाला असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. याप्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशाल कैलास शिंदे असे मयताचे नाव आहे. गणेश सुर्यकांत पटारे ( 27 वर्ष रा तारकस गल्ली, बेगमपुरा) असे आरोपीचे नाव आहे. या घटनेविषयी बेगमपुरा पोलिसांनी सांगितले की मयताच भाऊ तक्रारदार गौरव कैलास शिंदे (रा.माळीवाडा गल्ली) यांनी पोलिसांत तक्रार नोंदविली. आरोपी आणि मयत हे बेगमपुरा येथील माळीवाडा येथील रहिवाशी आहेत. दोघेही एकाच गल्लीत राहतात. मयत विशाल याने आरोपीच्या भावाला चाकू दाखवून दोन वर्षांपूर्वी धमकावले होते. तेव्हापासून आरोपीच्या मनात त्याच्याविषयी राग होता. 

शुक्रवारी रात्री गणेश पठारे हा मोटरसायकलवर घरी जात होता .त्यावेळी विशाल जगदिश खरातच्या घरासमोर वाळूवर दोन मित्र रात्री साडेबारा ते एक वाजेपर्यंत दारू पीत बसल्याचे दिसले. येता जाता आपल्याला धमकवणारा आणि भावाला चाकू दाखवणारा विशाल मित्रासोबत मजा करीत असल्याचे पाहून आरोपीचे डोके सटकले. यावेळी त्यांने दुचाकी उभी करून आल्याआल्या विशालवर चाकूने सपासप वार करू लागला. हे पाहून त्याचे मित्र घाबरले आणि ते पळू लागले. गणेश त्यांनाही मारण्यासाठी धावला मात्र ते पळून गेले. त्यानंतर पुन्हा परत येत विशालला लाथा मारल्या. त्यानंतर तो तिथून निघून गेला.

या घटनेनंतर गंभीर जखमी झालेल्या विशाल यास त्याच्या नातेवाईकांनी बेशुद्ध अवस्थेत घाटी रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी त्याला तपासून मयत घोषित केले. या घटनेची माहिती कळतात बेगमपुरा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक विशाल बोडके आणि अन्य अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

Web Title: Blood spilled from street brawls; A young man was stabbed to death due to an old dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.