सुंदरनगरात अनैतिक संबंधातून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 01:02 AM2017-08-04T01:02:26+5:302017-08-04T01:02:26+5:30

पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पतीने डोक्यात लोखंडी मुसळी मारून ३५ वर्षीय व्यक्तीचा खून केल्याची घटना चंदनझिरा परिसरात घडली.

 Bloodshed in the Sunder Nagar immoral relationship | सुंदरनगरात अनैतिक संबंधातून खून

सुंदरनगरात अनैतिक संबंधातून खून

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पतीने डोक्यात लोखंडी मुसळी मारून ३५ वर्षीय व्यक्तीचा खून केल्याची घटना चंदनझिरा परिसरात घडली. या प्रकरणी गुरुवारी चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खून झालेल्या व्यक्तीचे नाव शेख रऊफ शेख इब्राहीम (३५, रा. अशोक चौक सुंदरनगर) असे आहे. पोलीस सूत्रांनी सांगितले, की संशयित भूपेंद्र यादव हा कामानिमित्त काही वर्षांपूर्वी बिहारहून जालन्याला आला होता. पत्नी व तीन मुलांसोबत तो सुंदरनगर भागात किरायाने राहत होता.
मात्र, पती-पत्नीमध्ये बेबनाव झाल्याने यादव वर्षभरापासून पत्नीसोबत राहत नव्हता. आपल्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय भूपेंद्र यास होता. पत्नी व मुलांना आपल्या घरी घेऊन जाण्याच्या उद्देशाने यादव एक आॅगस्टरोजी पत्नी राहत असलेल्या सुंदनगरातील घरी आला. तेंव्हा शेख रऊफ शेख इब्राहीम घरात दिसल्याने भूपेंद्र यादवचा पत्नी व शेख रऊफ सोबत वाद झाला. रागाच्या भरात यादवने शेख रऊफच्या डोक्यात लोखंडी मुसळीने वार केला. त्यामुळे शेख रऊफ गंभीर जखमी होऊन खाली कोसळला. या प्रकारानंतर यादव पळून गेला. त्याच्या पत्नीने चंदनझिरा पोलीस ठाण्यात येऊन सर्व प्रकार सांगितला.
उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी, चंदनझिरा ठाण्याचे पोलीस निरीक्षक योगेश गावडे यांनी घटनास्थळी जाऊन जखमी रऊफ शेख यास जिल्हा सामान्य रुग्यालात दाखल केले. तीथे प्रथोमपचार केल्यानंतर त्यास औरंगाबाद शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान रऊफ शेखचा बुधवारी रात्री मृत्यू झाला. या प्रकरणी शेख मुस्तफा शेख इब्राहीम याच्या फिर्यादीवरून चंदनझिरा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही. एस. पाटील तपास करत आहेत.

Web Title:  Bloodshed in the Sunder Nagar immoral relationship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.