मंडळ अधिकारी तालुका मुक्कामी, तलाठी नॉट रिचेबल
By Admin | Published: May 15, 2014 11:34 PM2014-05-15T23:34:08+5:302014-05-16T00:17:09+5:30
बाºहाळी : येथील मंडळ अधिकारी तालुक्यालाच मुक्काम ठोकून कारभार पाहत आहेत़ तर तलाठ्याचा गावप्रवेश केव्हा होतो हेच कळत नसून फोन लावेल तेव्हा नॉट रिचेबल असतो़
बाºहाळी : येथील मंडळ अधिकारी तालुक्यालाच मुक्काम ठोकून कारभार पाहत आहेत़ तर तलाठ्याचा गावप्रवेश केव्हा होतो हेच कळत नसून फोन लावेल तेव्हा नॉट रिचेबल असतो़ त्यामुळे नागरिकांची मात्र गैरसोय होत आहे़ जसजसा जून महिना जवळ येत आहे, तसा शेतकरी येणार्या खरीप हंगामासाठी, विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी तयारीस लागला आहे़ शेतकर्यांना खरीप पेरणीसाठी कराव्या लागणार्या आर्थिक तरतुदीसाठी बँकेकडे कर्जमागणी करावी लागते़ यासाठी सातबार्यावर बोजा टाकणे आवश्यक आहे़ परंतु तलाठी येतात केव्हा व जातात केव्हा हेच समजत नाही़ त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी वेगवेगळे प्रमाणपत्र काढावे लागतात़ त्यात रहिवासी, उत्पन्न, नॉन क्रिमिलीयर, जात प्रमाणपत्र यांचा समावेश होतो़ या प्रमाणपत्रासाठी तलाठी व मंडळ अधिकार्यांची आवश्यकता असते. बाºहाळी मंडळ अधिकारी कोनेरी यांच्याकडे कायम पदभार असतानाही बाºहाळीत त्यांचे कार्यालयच नाही़ विशेष म्हणजे शासन दप्तरी बाºहाळी मुक्कामी असल्याची नोंद आहे़ ज्यांचे काम असेल त्यांनी कोनेरी साहेबांशी फोनवर संपर्क साधावा, त्यांनी सांगितलेल्या वेळेतच त्यांची भेट घेतल्यास त्यांचे काम होते़ त्याचप्रमाणे बाºहाळी येथे दुगमवार यांच्याकडे तलाठ्याचा कायम पदभार होता़ परंतु काही महिन्यापूर्वी त्यांच्याकडे लग्न असल्यामुळे दूधवण नामक व्यक्तीकडे तात्पुरता पदभार देण्यात आला़ पण त्यांनीही अन्य ठिकाणी नोकरी मिळाल्याने तलाठी पदास रामराम केला़ सद्यस्थितीत तोटरे यांच्याकडे पदभार देण्यात आला असून त्यांचा अद्याप बाºहाळीशी संबंध आलाच नाही़ तहसीलदार घोलवे यावर म्हणाले की, मुख्यालयी राहण्याचे लेखी आदेश काढण्यात आले. येत्या एक ते दोन दिवसांत आदेश संबंधितांच्या हाती पडतील.