मूकबधिरांच्या देहबोलीने घेतला हृदयाचा ठाव

By Admin | Published: August 10, 2015 12:40 AM2015-08-10T00:40:51+5:302015-08-10T00:59:13+5:30

सोमनाथ खताळ , बीड ती माणसासारखी माणसं, केवळ ऐकता-बोलता येत नाही म्हणून दुरावलेली...मात्र त्यांचीही एक दुनिया आहे. त्यांनाही भावना आहेत, तेही संवेदनशील आहेत.

The body of the dead body is in the heart of the heart | मूकबधिरांच्या देहबोलीने घेतला हृदयाचा ठाव

मूकबधिरांच्या देहबोलीने घेतला हृदयाचा ठाव

googlenewsNext


सोमनाथ खताळ , बीड
ती माणसासारखी माणसं, केवळ ऐकता-बोलता येत नाही म्हणून दुरावलेली...मात्र त्यांचीही एक दुनिया आहे. त्यांनाही भावना आहेत, तेही संवेदनशील आहेत. हावभाव आणि देहबोलीची भाषा जेव्हा कलेत रूपांतरित होते तेव्हा ती धडधाकट माणसांच्या हृदयाचा ठाव घेतल्यावाचून राहत नाही. याचा प्रत्यय रविवारी मूकबधिरांच्या सांस्कृतिक स्पर्धेच्या निमित्ताने आला.
जिल्हा मूकबधिर असोसिएशनच्यावतीने सांस्कृतिक स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. राज्यातील सुमारे ३५० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. यावेळी नृत्य, नाट्य, मूकाभिनय आदी स्पर्धा झाल्या.
मुक अभिनयातून प्रबोधन
राज्यातून आलेल्या युवक-युवतींनी नृत्याबरोबरच मुक अभिनयही सादर केले. यामधून त्यांनी स्त्री भू्रण हत्या, धुम्रपान टाळा, मद्यपान करणे आयुष्यास हानिकारक आहे, सदृढ आरोग्यासाठी सकस आहार घ्या यासारख्या विविध विषयांवर प्रबोधन करण्यात आले.
वासंती आजीने मिळविल्या टाळ्या
मुंबई येथील मूकबधीर कलावंतांचा चमू घेऊन ७० वर्षीय वासंती बनाजी कुलकर्णी यांनी सुरूवातीला चार नृत्य शांतपणे पाहिली. परंतु कलाकाराची कला कुठल्या क्षणी जागी होईल, याचा कधीच नेम नसतो. याप्रमाणे त्यांनाही आपल्या कलेवर आवर घालता आला नाही. आणि त्यांनी चक्क स्टेजवर एन्ट्री केली. कुलकर्णी आजी यांनी मुकअभिनया बरोबरच लावणीवर बहारदार नृत्य केले. यावेळी उपस्थित हजारो युवक-युवतींनी हात उंचावून आजींना साथ दिली.पाच मिनीटांचा हा क्षण सर्वांनी डोळ्यात साठवून ठेवला. तर काहींनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. आजीबार्इं नृत्य करीत असताना उपस्थित तरूणाई चांगलीच फिदा झाली. शिट्टया, टाळ्यांनी त्यांना प्रतिसाद दिला. वासंती कुलकर्णी या आजीबार्इंचे नृत्य स्पर्धेतील आकर्षणाचा भाग ठरला.

Web Title: The body of the dead body is in the heart of the heart

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.