विद्यार्थिनीचा मृतदेह दरीत आढळला

By Admin | Published: July 16, 2017 12:26 AM2017-07-16T00:26:05+5:302017-07-16T00:35:32+5:30

बनोटी/घाटनांद्रा : सोयगाव तालुक्यातील हनुमंतखेडा येथून बेपत्ता झालेल्या दहावीच्या विद्यार्थिनीचा मृतदेह खून झालेल्या अवस्थेत घाटनांद्रा -पाचोरा रस्त्यावरील खोल दरीत आढळल्याने खळबळ उडाली आहे.

The body of the girl was found in the valley | विद्यार्थिनीचा मृतदेह दरीत आढळला

विद्यार्थिनीचा मृतदेह दरीत आढळला

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बनोटी/घाटनांद्रा : सोयगाव तालुक्यातील हनुमंतखेडा येथून बेपत्ता झालेल्या दहावीच्या विद्यार्थिनीचा मृतदेह खून झालेल्या अवस्थेत घाटनांद्रा -पाचोरा रस्त्यावरील खोल दरीत आढळल्याने खळबळ उडाली आहे.
सीमा रामा राठोड (१५, रा. हनुमंतखेडा) असे मृत मुलीचे नाव आहे. ती हनुमंतखेडा येथील स्व. स्वातंत्र्यसैनिक सरिचंद राठोड विद्यालयातील इयत्ता दहावीत शिक्षण घेते. शुक्रवारी आई मजुरी करण्यासाठी व वडील शेळ्या चारण्यासाठी जंगलात गेले होते. त्यामुळे शुक्रवारी शाळा सुटल्यानंतर आईला मदत म्हणून आपण स्वयंपाक करुन ठेवू म्हणून तिने भाकरी टाकण्यासाठी पिठाचा डबा काढला व माठात पाणी घेण्यासाठी गेली पण माठ कोरडा होता. त्यामुळे
पीठ झाकून सीमा पाणी आणण्यासाठी गावाजवळील विहिरीवर गेली. गावात पाईपलाईनचे काम सुरू असल्याने तीन चार दिवसांपासून नळाला पाणी आलेले नव्हते. सीमा पाणी घेऊन परत आली नाही म्हणून आई वडीलांनी व गावातील मंडळींनी सीमाचा शोध घेतला.
नातेवाईकांना फोन करुन विचारले पण रात्री उशिरापर्यंत तपास लागला नाही. म्हणून शनिवारी सकाळी पुन्हा शोध घेण्यास सुरुवात केली. याबाबत बनोटी दुरक्षेत्रात तक्रार दाखल करण्यासाठी गावकरी गेले, तेव्हा पोलीस शिपाई योगेश झाल्टे यांना दूरध्वनी आला की घाटनांद्रा घाटात एका मुलीचा मृतदेह पडलेला आहे.
यावरुन गावातील नागरिक व नातेवाईकांनी तिकडे धाव घेतली. दरीत पडलेला मृतदेह सीमाचाच असल्याचे निष्पन्न झाल्याने खळबळ उडाली.
सीमाला दगडाने ठेचून मारण्यात आले असून तिचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. सिल्लोडचे सहायक पोलीस निरीक्षक शंकर शिंदे व सोयगावचे पोलीस निरीक्षक सुजित बडे पुढील तपास करीत आहेत.

Web Title: The body of the girl was found in the valley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.