लिबेंजळगावात आढळला अनोळखी तरुणाचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:02 AM2021-07-04T04:02:56+5:302021-07-04T04:02:56+5:30

लिंबेजळगांव : येथील बस स्थानक लगत असलेल्या विहिरीत एका पंचवीस वर्षीय अनोळखी तरुणाचा मृतदेह शनिवारी सकाळी आढळून आला. ही ...

The body of an unidentified youth was found in Libenjal village | लिबेंजळगावात आढळला अनोळखी तरुणाचा मृतदेह

लिबेंजळगावात आढळला अनोळखी तरुणाचा मृतदेह

googlenewsNext

लिंबेजळगांव : येथील बस स्थानक लगत असलेल्या विहिरीत एका पंचवीस वर्षीय अनोळखी तरुणाचा मृतदेह शनिवारी सकाळी आढळून आला. ही वार्ता गावात पसरताच बघ्यांची गर्दी जमली होती. वाळूज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढला असून, त्याची ओळख पटविणे सुरू आहे. दरम्यान, ही आत्महत्या असेल की, घातपात यावर गावात चर्चा सुरू होत्या.

लिंबेजळगाव बस स्थानक परिसराला लागून नागझरी नदीचे पात्र आहे. या पात्रात असलेल्या विहिरीत अज्ञात तरुणाचा मृतदेह गावकऱ्यांना आढळून आला. त्यांनी तुर्काबाद खराडी पोलीस चौकीला माहिती दिली. त्याचबरोबर, वाळूज पोलीस ठाण्यात माहिती दिली गेली. पोनि. संदीप गुरमे, उपनिरीक्षक लक्ष्मण उंबरे, उपनिरीक्षक विनायक शेळके, उपनिरीक्षक सय्यद, पोहेकाॅ. विजय जारवाल, पोलीस पाटील बाबासाहेब पडघन यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, गावात ही आत्महत्या आहे की, घातपात यावर चर्चा सुरू झाली होती. अग्निशमन दलाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून घाटीत शवविच्छेदनसाठी पाठविला. अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली.

Web Title: The body of an unidentified youth was found in Libenjal village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.