बोगस नोकर भरती; दोषींवर कारवाईचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 12:45 AM2017-11-30T00:45:29+5:302017-11-30T00:45:34+5:30

महापालिकेत २०१०-१४ या पाच वर्षांमध्ये लाड समितीच्या माध्यमाने तब्बल १८८ सफाई कर्मचारी नियुक्त करण्यात आले. या सर्व नेमणुका नियम धाब्यावर बसवून करण्यात आल्याचे यापूर्वीच उघडकीस आले आहे.

 Bogus recruitment; The order for action against the guilty | बोगस नोकर भरती; दोषींवर कारवाईचे आदेश

बोगस नोकर भरती; दोषींवर कारवाईचे आदेश

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : महापालिकेत २०१०-१४ या पाच वर्षांमध्ये लाड समितीच्या माध्यमाने तब्बल १८८ सफाई कर्मचारी नियुक्त करण्यात आले. या सर्व नेमणुका नियम धाब्यावर बसवून करण्यात आल्याचे यापूर्वीच उघडकीस आले आहे. या प्रकरणात शासनाने पुणे महानगर परिवहन महामंडळाचे संचालक तुकाराम मुंढे यांच्याकडून बोगस नोकरभरतीची चौकशी करण्यात आली. मुंढे यांनी आपला अहवाल शासनाला सादर केला. त्यानंतर शासनाने लगेच महापालिकेतील दोषी अधिकाºयांवर कारवाई करावी, असे आदेश महापालिका आयुक्तांना दिले. त्यामुळे मनपातील अधिकाºयांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
महापालिकेत काम करणारा एखादा सफाई मजूर निवृत्त झाल्यास त्याच्या जागेवर त्याच्या रक्तातील नातलगाला तो आपल्या जागेवर नोकरीवर लावू शकतो. दत्तक घेतलेल्या मुलालाही नोकरीवर लावण्याची मुभा आहे. लाड समितीमार्फत ही सर्व भरती करण्यात येते. समितीअंतर्गत सफाई मजुरांसाठी कायदे अत्यंत सोयीचे केले आहेत. याच कायद्याचा गैरफायदा घेत महापालिकेतील काही अधिकारी व कर्मचाºयांनी २०१०-१४ या पाच वर्षांत १८८ कर्मचाºयांची बोगस भरती केली. या बोगस नोकरी घोटाळ्याचा पर्दाफाश झाला. २०१५ मध्ये विधानसभेत तारांकित प्रश्नही उपस्थित झाला. मुख्यमंत्र्यांनी सभागृहात या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले. शासनाने नवी मुंबईचे तत्कालीन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडून चौकशी करण्याचा निर्णय घेतला. नंतर मुंढे यांची पुण्याला महानगर परिवहन महामंडळाच्या संचालकपदी बदली झाली. आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून मुंढे यांनी तीन ते चार महिन्यांपूर्वी औरंगाबादेत येऊन सखोल चौकशीही केली. भरतीसंदर्भातील कागदपत्रेही ते पुण्यालाही घेऊन गेले होते.

Web Title:  Bogus recruitment; The order for action against the guilty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.