रोहयो मंत्र्यांच्या गावातच बोगस कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:02 AM2021-05-23T04:02:27+5:302021-05-23T04:02:27+5:30

पैठण : रोहयो तथा फलोत्पादनमंत्री संदीपान भुमरे यांचे गाव असलेल्या पाचोडमध्ये धनदांडग्यांच्या नावावर रोहयोचे जॉबकार्ड तयार करून लाखो रुपये ...

Bogus works in the village of Rohyo ministers | रोहयो मंत्र्यांच्या गावातच बोगस कामे

रोहयो मंत्र्यांच्या गावातच बोगस कामे

googlenewsNext

पैठण : रोहयो तथा फलोत्पादनमंत्री संदीपान भुमरे यांचे गाव असलेल्या पाचोडमध्ये धनदांडग्यांच्या नावावर रोहयोचे जॉबकार्ड तयार करून लाखो रुपये लाटल्याचा गंभीर प्रकार पुढे आला आहे. पैसे लाटतांना चक्क कोविड सेंटरमध्ये उपचार घेणारे रुग्ण रोहयोच्या कामावर दाखविण्याचा प्रताप यंत्रणेने केला. विशेष म्हणजे पाचोड ग्रामपंचायतचे सरपंच रोहयोमंत्री भुमरे यांचे पुतणे शिवराज भुमरे असताना पाचोड ग्रामपंचायतअंतर्गत झालेल्या या रोहयो कामात गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले आहे. याबाबत कारवाईची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दत्ता गोर्डे यांनी केली आहे.

पैठण तालुक्यात मजुरासाठी रोहयोअंतर्गत कोट्यवधी रुपयाचे कामे मंजूर आहे. या कामावर मजुराऐवजी धनदांडगे व्यापारी, वकील, कारखान्याचे माजी एम.डी., निमशासकीय कर्मचारी, इन्कम टॅक्स भरणारे कामावर दाखवून मोठी रक्कम लाटल्याचा गंभीर प्रकाराने खळबळ उडाली आहे. पैसे लाटल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधितांनी आम्ही रोहयोच्या कामावर नव्हतोच तसेच याबाबत आम्हाला काहीच माहिती नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

अंबड (जि. जालना) हद्दीत येणाऱ्या बीड बायपास ते साजेगाव हा रस्ता पाचोड ग्रामपंचायतीद्वारे रोहयोतून उरकण्यात आल्याचेही कागदपत्रावरून समोर आले आहे. विशेष म्हणजे हा रस्ता मजुराऐवजी मशीनरी वापरून केला आहे, असा आरोप गोर्डे यांनी केला आहे. या रस्त्यावर कोरोना रुग्णांनी काम केल्याचे मस्टरवर दाखविण्यात आले आहे. यात सुरेश अशोक नरवडे, शिवकन्या नरवडे, विनोद नरवडे, संगीता सुरेश बडजाते, यश भुमरे हे कोरोना उपचार घेत असताना दुसरीकडे हेच रोहयोच्या कामावर दाखविण्यात आल्याचे पुढे आले आहे. इन्कम टॅक्स भरणारे पाचोडचे सिमेंट व स्टील विक्रेते सुरेश बडजाते असे मोठमोठ्या धनदांडग्यांच्या नावावर मजुराचे पैसे लाटण्यात आले आहे.

----- कामानंतर भरले मस्टर ------

पाचोड ग्रामपंचायतीच्या निवडणुकीआधी पाचोडमध्ये रस्त्यांची कामे झाली. यानंतर हीच कामे रोहयोत दाखवून पैसे लाटण्याचा प्रकार सुरू आहे. कामे झाल्यानंतर सध्या बोगस मास्टर भरण्याचे काम सुरू आहे. अंबड तालुका हद्दीत रोहयो काम करण्याचा प्रताप पाचोड ग्रामपंचायतने केल्याचे गोर्डे यांचे म्हणणे आहे. रोहयोअंतर्गत मजुराने स्वतः काम मागणीचे पत्र द्यावे लागते. त्यानंतर रोजगार हमीतून रोजगार उपलब्ध करून दिला जातो. मात्र पाचोडमध्ये नियम डावलून मलिदा लुटण्यात आला आहे.

Web Title: Bogus works in the village of Rohyo ministers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.