कलाशिक्षक महासंघाची शासनाविरोधात बोंबाबोंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:04 AM2021-03-29T04:04:11+5:302021-03-29T04:04:11+5:30

चित्रकला ग्रेड परीक्षेचे गुण यावर्षी न देण्याच्या निर्णयाने लाखो विद्यार्थ्यांवर अन्याय झाला, तर विद्यार्थी व पालक वर्गात प्रचंड नाराजी ...

Bomb blast against the government of the Federation of Arts Teachers | कलाशिक्षक महासंघाची शासनाविरोधात बोंबाबोंब

कलाशिक्षक महासंघाची शासनाविरोधात बोंबाबोंब

googlenewsNext

चित्रकला ग्रेड परीक्षेचे गुण यावर्षी न देण्याच्या निर्णयाने लाखो विद्यार्थ्यांवर अन्याय झाला, तर विद्यार्थी व पालक वर्गात प्रचंड नाराजी पसरली आहे. हा आदेश तात्काळ मागे घ्यावा यासाठी महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघाचे अध्यक्ष विनोद इंगोले, उपाध्यक्ष प्रल्हाद शिंदे-हस्तेकर, सरचिटणीस प्रल्हाद सांळुके यांनी तंत्रशिक्षण मंत्र्यांना विनंती केली होती. तर आदेश मागे न घेतल्यात राज्यभर सर्व जिल्ह्यांत निर्णयाची होळी करू, असा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार रविवारी औरंगाबादेत भारतीय पारंपरिक पद्धतीने होळी पेटवून उपाध्यक्ष प्रल्हाद शिंदे, जिल्हाध्यक्ष संजय जाधव, कोषाध्यक्ष राजेश निंबेकर, संघटक विवेक महाजन यांनी बोंबा मारून शासन आदेशाची होळी केली. शासनाने हा आदेश मागे घेतला नाही तर राज्यातील सर्व शाळांमध्ये निषेध आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघाने दिला आहे.

Web Title: Bomb blast against the government of the Federation of Arts Teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.