बसमध्ये बॉम्ब; अफवेने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 01:15 AM2017-12-24T01:15:15+5:302017-12-24T01:17:02+5:30

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग एका कार्यक्रमानिमित्त शहरात आलेले असताना पुण्याहून प्रवासी घेऊन शहरात येणा-या एस.टी. महामंडळाच्या शिवनेरी बसमध्ये बॉम्ब असल्याचा फोन पोलीस नियंत्रण कक्षाला प्राप्त होताच खळबळ उडाली.

 Bombs in bus; Rumors | बसमध्ये बॉम्ब; अफवेने खळबळ

बसमध्ये बॉम्ब; अफवेने खळबळ

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग एका कार्यक्रमानिमित्त शहरात आलेले असताना पुण्याहून प्रवासी घेऊन शहरात येणा-या एस.टी. महामंडळाच्या शिवनेरी बसमध्ये बॉम्ब असल्याचा फोन पोलीस नियंत्रण कक्षाला प्राप्त होताच खळबळ उडाली.
छावणीतील लोखंडी पुलावर बस अडवून कर्णपुरा येथील मैदानावर नेण्यात आली. बॉम्ब शोधक आणि नाशक (बीडीडीएस) पथकाने बसमधील प्रत्येक प्रवाशासह बसची कसून तपासणी केली, तेव्हा बॉम्बची अफवाच असल्याचे निष्पन्न झाले आणि सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, माजी कृषिमंत्री शरद पवार हे एका कार्यक्रमानिमित्त शहरात आलेले असताना पुण्याहून शहरात दाखल होत असलेल्या शिवनेरी बसमध्ये (क्रमांक एमएच-६ एस ९३८७) बॉम्ब असल्याचा फोन पोलीस नियंत्रण कक्षाला ३ वाजेच्या सुमारास प्राप्त झाला. या कॉलची माहिती पोलीस आयुक्तांसह सर्व पोलीस अधिकारी-कर्मचारी आणि बीडीडीएसपथकाला देण्यात आली. छावणी पोलीस, वाहतूक शाखेच्या पोलीस अधिकारी-कर्मचाºयांनी छावणीतील लोखंडी पुलावर शिवनेरी बस अडविली आणि बसचालकास गाडी थेट कर्णपुरा येथील मोकळ्या जागेत उभी करण्याचे सांगितले. यानंतर पोलिसांच्या मोठ्या ताफ्याने बसला घेराव घातला. प्रथम सर्व प्रवाशांना बसमधून उतरवून त्यांची तपासणी करण्यात आली. यानंतर बीडीडीएसचा स्फोटक शोधक श्वान आणि मेटल डिटेक्टरने बसची कसून तपासणी करण्यात आली.
प्रवाशांचे सर्व सामान आणि पार्सलची तपासणी करण्यात आली. या तपासणीत बसमध्ये कोणतीही आक्षेपार्ह आणि संशयास्पद वस्तू न आढळल्याने सर्वांनी सुटकेचा सुसकारा सोडला. कुणीतरी खोडसाळपणा केल्याचे नंतर स्पष्ट झाले. मात्र कर्णपुरा मैदानावरील हा प्रकार पाहून नागरिकांनी रस्त्यावर गर्दी केली.
बसस्थानकावरील बसेसची तपासणी
कर्णपुरा येथे बसच्या तपासणीत काहीही नसल्याचे निष्पन्न झाल्यानंतर बीडीडीएसच्या पथकाने मध्यवर्ती बसस्थानक येथे जाऊन अन्य शिवनेरी आणि अश्वमेध बसेसची तपासणी सुरू केली. शिवाय साध्या वेशातील अधिकारी बसस्थानकावरील संशयास्पद वस्तू आणि व्यक्तींवर नजर ठेवून होते.

Web Title:  Bombs in bus; Rumors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.