शहर पोलीसचे दोन्ही संघ विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 12:47 AM2017-12-03T00:47:31+5:302017-12-03T00:47:58+5:30

औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरूअसलेल्या १३ व्या व्हेरॉक करंडक औद्योगिक ट्वेंटी २0 क्रिकेट स्पर्धेत शहर पोलीस ब संघाने आयुर्विमा संघावर ४ गडी राखून मात केली.

Both the city police won the team | शहर पोलीसचे दोन्ही संघ विजयी

शहर पोलीसचे दोन्ही संघ विजयी

googlenewsNext

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरूअसलेल्या १३ व्या व्हेरॉक करंडक औद्योगिक ट्वेंटी २0 क्रिकेट स्पर्धेत शहर पोलीस ब संघाने आयुर्विमा संघावर ४ गडी राखून मात केली. दुसºया लढतीत शहर पोलीस अ संघाने एमएसईडीसीएल संघावर ३६ धावांनी विजय मिळवला. इम्रान पटेल व राहुल जोनवाल हे आज झालेल्या सामन्यात सामनावीर ठरले.
पहिल्या सामन्यात आयुर्विमा संघाने प्रथम फलंदाजी करताना १८ षटकांत सर्वबाद ९९ धावा केल्या. त्यांच्याकडून दिनेश नाकील याने ४१ चेंडूंत ३ चौकारांसह ३४, सुफियान अहमदने २१ आणि संजय भुसारे याने १२ धावा केल्या. २३ धावा त्यांना अवांतर धावांच्या रूपात मिळाल्या. शहर पोलीस ब संघाकडून इम्रान पटेल याने १८ धावांत ५ गडी बाद केले. अकबर शेख व राजू परचाके यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात शहर पोलीस ब संघाने विजयी लक्ष्य १४.१ षटकांत ६ गडी गमावून गाठले. त्यांच्याकडून इम्रान पटेलने २१ धावांत ४ चौकारांसह २६, मोहंमद आमेरने २४ चेंडूंत २ चौकारांसह २६ धावा केल्या. आयुर्विमा संघाकडून महेश रेड्डीने १७ धावांत २ तर सुफियान अहमद, संजय भुसारे व दिनेश नाकील यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
दुपारच्या सत्रात एमएसडीसीएलविरुद्ध शहर पोलीसने २0 षटकांत ९ बाद १४0 धावा केल्या. त्यांच्याकडून सुदर्शन एखंडे याने २८ चेंडूंत १ षटकार व ३ चौकारांसह ३१, राहुल जोनवाल याने २९ चेंडूंत ३ चौकार व एका षटकारासह ३७ व मोहंमद इम्रानने ३ चौकारांसह २१ धावा केल्या. एमएसडीसीएलकडून इनायत अली सय्यद याने २५ धावांत ३ गडी बाद केले. स्वप्नील चव्हाण, संजय बनकर, कैलास शेळके, पांडुरंग धांडे यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात एमएसडीसीएल संघ १९.३ षटकांत १0४ धावांत सर्वबाद झाला. त्यांच्याकडून स्वप्नील चव्हाणने ५ चौकारांसह ३७ व इनायत अली याने ५ चौकारांसह २४ व अकीब खानने २१ धावांचे योगदान दिले. शहर पोलीस अ संघाकडून मोहंमद इम्रानने १३ धावांत ३ गडी बाद केले. शेख असीफने २ तर राहुल जोनवाल, शेख जिलानी व शेख मुकीम यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.

Web Title: Both the city police won the team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.