मोबाईल टॉवर्सच्या बॅटऱ्या चोरणारे दोघे अटकेत, ३४ बॅटऱ्यांसह कार जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 11:38 PM2019-07-15T23:38:31+5:302019-07-15T23:38:55+5:30
विविध ठिकाणच्या मोबाईल टॉवर्सच्या बॅटºया चोरणाºया उत्तर प्रदेशातील दोन चोरट्यांना मुकुंदवाडी पोलिसांनी रामनगर येथे सोमवारी पकडले. त्यांच्याकडून चोरीच्या ३४ बॅटºया आणि चोरी करण्यासाठी वापरलेली कार जप्त करण्यात आली.
औरंगाबाद : विविध ठिकाणच्या मोबाईल टॉवर्सच्या बॅटºया चोरणाºया उत्तर प्रदेशातील दोन चोरट्यांना मुकुंदवाडी पोलिसांनी रामनगर येथे सोमवारी पकडले. त्यांच्याकडून चोरीच्या ३४ बॅटºया आणि चोरी करण्यासाठी वापरलेली कार जप्त करण्यात आली.
रिजवान शहानाजुदीन (२६) आणि जलालुदीन बिरबल (२२, रा. कामरुद्दीननगर, मढियाई, जि.मेरठ, उत्तर प्रदेश), अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. मुकुंदवाडी पोलिसांनी सांगितले की, रामनगर येथील घरात भाड्याने राहणारे दोन जण कारमधून बॅटºया आणून घरात ठेवतात, अशी माहिती खबºयाने मुुकुंदवाडी पोलिसांना दिली. यानंतर पोलीस उपायुक्त राहुल खाडे, सहायक आयुक्त गुणाजी सावंत, पोलीस निरीक्षक यू.जी. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राहुल बांगर, उपनिरीक्षक अमोल म्हस्के, पोलीस क र्मचारी कैलास काड, असलम शेख, विजय चौधरी, प्रकाश सोनवणे, सोमकांत भालेराव, सुनील पवार, विकास गायकवाड, सुधाकर पाटील यांनी सोमवारी (दि. १५) दुपारी संशयिताच्या घरावर धाड टाकली. आरोपींची खोली बॅटºयांनी भरलेली दिसली. आरोपींच्या घरासमोर उभ्या कारमध्येही काही बॅटºया होत्या. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली तेव्हा ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. आम्ही जुन्या बॅटºया खरेदी करण्याचा व्यवसाय करतो, असे ते सांगू लागले. मात्र, पोलिसांनी खाक्या दाखविताच त्यांनी गुन्ह्याची कबुली देत अंबड आणि बिडकीन परिसरातील मोबाईल टॉवर्सच्या बॅटºया चोरल्याचे सांगितले. आरोपींना अटक करून ३४ बॅटºया आणि कार असा सुमारे ३ लाख ५४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
आरोपी आंतरराज्यीय चोर
अटकेतील दोन्ही बॅटरीचोर उत्तर प्रदेशातील रहिवासी आहेत. एका मोबाईल टॉवरला सुमारे पंधरा ते वीस बॅटºया असतात. ग्रामीण भागातील मोबाईल टॉवर्स जंगलात असतात. शिवाय या टॉवर्सच्या सुरक्षेसाठी मोबाईल कंपन्यांकडून विशेष काळजी घेतली जात नसल्याची संधी साधून चोरटे बॅटºया पळवितात. आरोपींविरोधात विविध राज्यांत गुन्हे दाखल असण्याची शक्यता अधिकाºयांनी वर्तविली.