कंटेनरमधून बिअरचे बॉक्स चोरणारे दोघे जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 11:48 PM2018-12-03T23:48:14+5:302018-12-03T23:48:37+5:30
वाळूज महानगर : वाळूजजवळ रस्त्याच्याकडेला उभ्या असलेल्या कंटेनरचे सील फोडून ५२ हजार रुपये किमंतीचे ३२ बिअरचे बॉक्स लांबविणाऱ्या दोघांना सोमवारी वाळूज पोलिसांनी जेरबंद केले. याप्रकरणी वाळूज येथील दोघांना ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
वाळूज महानगर : वाळूजजवळ रस्त्याच्याकडेला उभ्या असलेल्या कंटेनरचे सील फोडून ५२ हजार रुपये किमंतीचे ३२ बिअरचे बॉक्स लांबविणाऱ्या दोघांना सोमवारी वाळूज पोलिसांनी जेरबंद केले. याप्रकरणी वाळूज येथील दोघांना ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
साजापूर फाटा येथील एस.पी.गोल्ड टान्सपोर्टमध्ये कंटेनर (एम.एच.२० डी.ई.२०१७) वर किशोर श्रीरंग गायकवाड (रा.वाळूज) हा चालक म्हणून काम करतो. या ट्रॉन्सपोटचे मॅनेजर किरण पाटील याने चालक किशोर यास वाळूज एमआयडीसीतील कॉल्सबर्ग कंपनीतून बिअरचे बॉक्स पुणे जिल्ह्यातील हवेली येथे पोहच करण्यास सांगितले. त्यामुळे १ डिसेंबरला सकाळी ९ वाजेच्या सुमारास किशोरने कंटेनरमध्ये १९ लाख ६४ हजार ९०४ रुपये किमंतीचे बिअर बॉटलचे १२०० बॉक्स घेऊन सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास साजापूरच्या ट्रॉन्सपोर्ट कंटेनर उभा करुन चालक झोपी गेला होता.
दुसºया दिवशी रविवार बिअरने भरलेला हा कंटेनर हवेली येथे पोहच करण्यासाठी किशोर निघाला होता. शिवराईजवळ रात्री ८ वाजेच्या सुमारास किशोर कंटेनर रस्त्याच्याकडेला उभा करुन जेवण करण्यासाठी वाळूजला घरी गेला. मध्यरात्रीनंतर १ वाजेच्या सुमारास किशोरला कंटेनरचे सिल तुटलेले व आतमधील काही बिअरचे बॉक्स गायब असल्याचे दिसून आले. त्यामुळे किशोरने किरण पाटील यांना याबाबत माहिती दिली.
पाटील व चालक किशोरने वाळूज पोलिस ठाण्यात ३२ बिअरचे बॉक्स चोरी झाल्याची तक्रार दिली. या प्रकरणी चोरट्यांविरुध्द वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या बिअर चोरीप्रकरणी रात्री उशिरा अभिषेक अरुण शिंदे व स्वप्निल भगवान कोतकर या संशयितांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक पवार यांनी दिली.