दोघांनी फसवणुकीसाठी बदलले गाव अन् नाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 12:49 AM2017-08-18T00:49:51+5:302017-08-18T00:49:51+5:30
हिवरा येथील एका मुलासोबत लग्न करून पावणेदोन लाखांची फसवणूक करणाºयातीन संशयितांना बदनापूर न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. फसवणूक करणाºयासाठी दोघांनी आपले नाव व गावही बदलल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बदनापूर : तालुक्यातील हिवरा येथील एका मुलासोबत लग्न करून पावणेदोन लाखांची फसवणूक करणाºयातीन संशयितांना बदनापूर न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. फसवणूक करणाºयासाठी दोघांनी आपले नाव व गावही बदलल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
औरंगाबादमधील सातारा परिसरातील एका २८ वर्षीय युवकास लग्न करून पावणेदोन लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तीन जणांवर बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर प्रकरणी वधू वर सूचक केंद्र चालक काकाजी यमाजी खाडे ( रा. कंडारी बु. ता. बदनापूर) गणेश संजय चव्हाण, क्षितिजा उर्फ पूजा संजय चव्हाण या तिघांची कसून चौकशी केली. गुरुवारी त्यांना बदनापूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिघांनाही १९ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यातील महिलेचे आई-वडील किनगावराजा येथील एका शेतात शेतमजूर म्हणून काम करतात. संजय चव्हाण याने त्याच्या गावी एक प्लॉट घेतलेला असून त्याने या प्लॉटचे ७० हजार रूपये एका नातेवाईकाला दिल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. या प्रकरणात आणखी काहींचा समावेश असण्याची शक्यता असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
तपास करणारे पोहेकॉ जॉन कसबे म्हणाले की, या प्रकरणातील पूजा चव्हाण व संजय चव्हाण हे दोन आरोपी भाऊ- बहीण असल्याचे लग्न जुळविताना सांगितले होते. मात्र हे पती-पत्नी आहेत. एका सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न लावल्याचे ते सांगत आहेत.
या दोघांचे गाव सातपूर नव्हे तर मांडवा (ता. लोणार, जि. बुलडाणा) आहे. खात्री करण्यासाठी कॉन्स्टेबल एस. पी. चव्हाण व जॉन कसबे हे दोघांना घेऊन त्यांच्या गावी गेले. तेव्हा दोघेही याच गावातील असून पती-पत्नी असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.