तिसरी लाट डोळ्यासमोर ठेवून २ कोटींची पलंग खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:04 AM2021-06-01T04:04:21+5:302021-06-01T04:04:21+5:30

शहरात सध्या कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात आलेली असली, तरी फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अडीच-तीन महिन्यांत शहर व जिल्ह्यात ...

Bought a bed worth Rs 2 crore with the third wave in mind | तिसरी लाट डोळ्यासमोर ठेवून २ कोटींची पलंग खरेदी

तिसरी लाट डोळ्यासमोर ठेवून २ कोटींची पलंग खरेदी

googlenewsNext

शहरात सध्या कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात आलेली असली, तरी फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अडीच-तीन महिन्यांत शहर व जिल्ह्यात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. त्यामुळे उपाययोजना करताना प्रशासनाची चांगलीच दमछाक झाली. त्यामुळे आता पालिकेने कोविड केअर सेंटरसाठी पलंग खरेदी करण्याचा निर्णय घेतला. यासाठी पलंग उत्पादक-विक्रेत्यांकडून दरपत्रक मागवून सर्वात कमी दरानुसार, म्हणजे २ हजार ८९० रुपये प्रति पलंग असा खर्च येणार आहे. ५ हजार पलंग खरेदी करण्यासाठी सुरुवातीला १ कोटी ४४ लाख ५० हजार रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले होते. सुधारित प्रस्तावानुसार ७ हजार पलंग खरेदीचा निर्णय घेण्यात आला, त्यासाठी २ कोटी २ लाख ३० हजार रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले आहे. राज्य शासनाकडून प्राप्त होणाऱ्या राज्य आपत्ती व्यवस्थापन निधी लेखाशीर्षातून पलंग खरेदी होत आहे.

Web Title: Bought a bed worth Rs 2 crore with the third wave in mind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.