पीएम किसान योजनेच्या कामावर महसूलचा बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:05 AM2021-06-16T04:05:26+5:302021-06-16T04:05:26+5:30
औरंगाबाद : पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे काम यापुढे कृषी विभागाकडून करून घेण्यात यावे, अशी मागणी राज्य तलाठी संघ, तहसीलदार, ...
औरंगाबाद : पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे काम यापुढे कृषी विभागाकडून करून घेण्यात यावे, अशी मागणी राज्य तलाठी संघ, तहसीलदार, नायब तहसीलदार संघटनेने निवदेनाद्वारे केली आहे. याबाबत संघटनेने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना निवेदन दिले आहे.
संघटनेने निवेदनात म्हटले आहे, याबाबत राज्य शासनाला निवेदन सादर करण्यात आले आहे; परंतु आजवर याबाबत कोणतीही धोरणात्मक भूमिका शासनाने घेतलेली नाही. त्यामुळे दोन्ही संघटनेत यापूर्वी दिलेल्या निवेदनानुसार पीएम किसान योजनेच्या कामावर टाकलेला बहिष्कार कायम राहील. जोपर्यंत या कामाबाबत पुढील आदेश देत नाही, तोपर्यंत तलाठी, मंडल अधिकारी तसेच नायब तहसीलदारांचा या कामावर बहिष्कार राहील, असे तलाठी संघाचे जिल्हाध्यक्ष अनिल सूर्यवंशी, नायब तहसीलदार संघटनेचे महेंद्र गिरगे, रीता पुरी, सिध्दार्थ धनजकर आदींनी कळविले आहे.