पोरगं अक्षरं गिरविणार अन् निसर्गालाही जीव लावणार! प्रत्येक शाळांमध्ये होणार ‘इको क्लब’

By राम शिनगारे | Published: July 18, 2024 08:18 PM2024-07-18T20:18:28+5:302024-07-18T20:18:40+5:30

पहिल्या दिवसापासून पर्यावरणाचे धडे ‘इको क्लब’अंतर्गत शाळांमध्ये पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पर्यावरणाविषयी धडे द्यायचे आहेत.

Boys will write letters and bring life to nature! 'Eco club' to be held in every school | पोरगं अक्षरं गिरविणार अन् निसर्गालाही जीव लावणार! प्रत्येक शाळांमध्ये होणार ‘इको क्लब’

पोरगं अक्षरं गिरविणार अन् निसर्गालाही जीव लावणार! प्रत्येक शाळांमध्ये होणार ‘इको क्लब’

छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार भविष्यात चांगले यशस्वी आणि नवोपक्रमशील नागरिक बनविण्यासाठी सर्व शालेय विद्यार्थ्यांमध्ये विशिष्ट कौशल्ये आणि क्षमता विकसित होणे गरजेचे आहे. या कौशल्यामध्ये पाणी आणि नैसर्गिक संसाधने यांचे जतन, स्वच्छता इतरच्या अनुषंगाने पर्यावरण जाणीवजागृती विकसित करणे, ही महत्त्वाची क्षमता आहे. ‘समग्र शिक्षक’अंतर्गत शाळेतील ‘इको क्लब’ ही एक योजना असून, या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी संवेदनशीलता विकसित करणे, सद्य:स्थितीतील पर्यावरणीय समस्या जाणून घेणे, सकारात्मक दृष्टिकोन आणि पर्यावरण संरक्षणाकरिता उपक्रम घेतले जातात. 

पहिल्या दिवसापासून पर्यावरणाचे धडे ‘इको क्लब’अंतर्गत शाळांमध्ये पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पर्यावरणाविषयी धडे द्यायचे आहेत. त्यासाठी एका आठवड्याचे उन्हाळी शिबिरही आयोजित करायचे आहे. त्या शिबिराच्या माध्यमातून आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारणे, शाश्वत अन्नप्रणाली स्वीकारणे, ई-कचरा कमी करणे, कचरा कमी करणे, ऊर्जा व पाणी बचत आणि प्लास्टिकचा वापर टाळणे या सात थीमवर आधारित उपक्रमाचे आयोजन करायचे आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शाळांमध्ये ‘इको क्लब’ देशभरात लागू करण्यात आलेले नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार प्रत्येक शाळांमध्ये इको क्लबची स्थापना करायची आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना पर्यावरणविषयी जनजागृती करून त्याचे संवर्धन कसे होईल, याकडे लक्ष द्यायचे आहे. नैसर्गिक संसाधनांचे जतन करणार नैसर्गिक संसाधनांचे जतन करण्यासाठी विद्यार्थ्यांना पहिलीच्या वर्गापासूनच प्रशिक्षण देण्याची योजना ‘इको क्लब’च्या माध्यमातून विकसित केली जाणार आहे. त्यातून नैसर्गिक संसाधनांचा वापर हा अतिशय काटकसरीने केला पाहिजे, त्याविषयी जनजागृतीही करण्यात येणार आहे. ई-कचराही कमी करणार पर्यावरणाचा ऱ्हास होण्यामध्ये ई-कचऱ्यांचाही मोठ्या प्रमाणात वाटा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ई-कचरा कमी करण्यासाठी शाळांमध्ये ई-कचरा संकलन केंद्र तयार करणे, ई-कचऱ्याचा पर्यावरणावर होणाऱ्या परिणामाविषयी माहिती देणे, या कचऱ्याची विल्हेवाट आणि जतन करून ठेवण्यासाठी अधिकृत संस्थांशी संपर्क साधण्याचेही प्रशिक्षण देण्यात येतील.

पर्यावरण जतन करण्याचा संदेश
नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रत्येक शाळांमध्ये इको क्लबची स्थापना करण्यात आली आहे. या उपक्रमांमध्ये शाळांमधील शिक्षकांसह विद्यार्थीही मोठ्या आनंदाने सहभागी होत आहेत. पर्यावरण संवर्धनासाठी यापूर्वीही अनेक शाळांमध्ये डेन्स फॉरेस्ट ही संकल्पना राबविण्यात आलेली आहे. त्यातून विद्यार्थ्यांना पर्यावरण जतन करण्याचा संदेश दिलेला आहे.
-जयश्री चव्हाण, शिक्षणाधिकारी
 

Web Title: Boys will write letters and bring life to nature! 'Eco club' to be held in every school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.