नांदेडमध्ये ब्रेनेडेड रुग्ण; एअर ॲम्ब्युलन्सने छत्रपती संभाजीनगरात आले किडनी, लिव्हर

By संतोष हिरेमठ | Published: October 8, 2023 07:05 PM2023-10-08T19:05:46+5:302023-10-08T19:06:42+5:30

छत्रपती संभाजीनगर : नांदेड येथील ब्रेनडेड रुग्णाची किडनी आणि लिव्हर घेऊन रविवारी एअर ॲम्ब्युलन्स छत्रपती संभाजीनगरातील चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल ...

Braindead patients in Nanded; Kidney, liver came to Chhatrapati Sambhajinagar by air ambulance | नांदेडमध्ये ब्रेनेडेड रुग्ण; एअर ॲम्ब्युलन्सने छत्रपती संभाजीनगरात आले किडनी, लिव्हर

नांदेडमध्ये ब्रेनेडेड रुग्ण; एअर ॲम्ब्युलन्सने छत्रपती संभाजीनगरात आले किडनी, लिव्हर

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : नांदेड येथील ब्रेनडेड रुग्णाची किडनी आणि लिव्हर घेऊन रविवारी एअर ॲम्ब्युलन्स छत्रपती संभाजीनगरातील चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले. 

अवयव प्रत्यारोपणासाठी विमानतळ ते बीड बायपासवरील कमलनयन बजाज रुग्णालयापर्यंत ग्रीन काॅरिडाॅरचे नियोजन करण्यात आले होते. नांदेडहून उड्डाण घेतल्यानंतर दुपारी किडनी, लिव्हर घेऊन एअर ॲम्ब्युलन्स चिकलठाणा विमानतळावर दाखल झाले.

याठिकाणाहून कमलनयन बजाज रुग्णालयातील पथक रुग्णवाहिकेने दोन्ही अवयव प्रत्यारोपणासाठी घेऊन रुग्णालयात पोहोचले. यासाठी सीईओ डाॅ. जॉर्ज फर्नांडिस, वैद्यकीय संचालक डाॅ. मिलिंद वैष्णव, प्रवीण जैन, प्रशांत पटवारी, उमेश धावणे, ‘झेडटीसीसी’चे फरहान हाशमी, अवयव प्रत्यारोपण समन्वयक सुभाष गवारे आदींनी प्रयत्न केले.

Web Title: Braindead patients in Nanded; Kidney, liver came to Chhatrapati Sambhajinagar by air ambulance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.