जागतिक हवामान बदलावर उद्या मंथन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 12:31 AM2017-12-13T00:31:58+5:302017-12-13T00:32:12+5:30

हवामान बदल व त्याचे शेतीवर होणारे परिणाम यावर सातत्याने संशोधन करणारे देश व विदेशातील शास्त्रज्ञ शहरात येत आहेत. एवढेच नव्हे तर राज्यातील चारही कृषी विद्यापीठ पुन्हा एकदा एकत्रित येऊन विचारमंथन करणार आहेत.

 Brainstorm on global climate change tomorrow | जागतिक हवामान बदलावर उद्या मंथन

जागतिक हवामान बदलावर उद्या मंथन

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : हवामान बदल व त्याचे शेतीवर होणारे परिणाम यावर सातत्याने संशोधन करणारे देश व विदेशातील शास्त्रज्ञ शहरात येत आहेत. एवढेच नव्हे तर राज्यातील चारही कृषी विद्यापीठ पुन्हा एकदा एकत्रित येऊन विचारमंथन करणार आहेत. १४ ते १६ डिसेंबरदरम्यान होणाºया या आंतरराष्ट्रीय चर्चासत्रातून निघालेले निष्कर्ष, उपाययोजना राज्य शासन, शास्त्रज्ञ, शेतकºयांसाठी दिशादर्शक ठरणार आहे.
एमजीएम महाविद्यालयातील रुक्मिणी सभागृहात १४ रोजी हवामान बदलावरील आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे सकाळी १० वाजता उद्घाटन होणार आहे. या आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे गांभीर्य लक्षात यावे, यासाठी वाल्मी येथे परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू वेंकटेश्वरलू यांनी पत्रपरिषद घेतली. कुलगुरूंनी सांगितले की, बदलते हवामान व त्याचा कृषी क्षेत्रावर होणाºया परिणामावर देश-विदेशात संशोधन सुरू आहे. या आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात शास्त्रज्ञ संशोधन, नवतंत्रज्ञानाची माहिती देणार आहे. शिवाय भविष्यातील हवामानबदलाच्या आव्हानांना कसे सामोरे जायचे व कोणत्या परिस्थितीत कोणते पीक शेतकºयाला तारू शकेल. याचा दिशादर्शक अहवाल या चर्चासत्रातील सखोल मंथनातून तयार करण्यात येणार आहे. याचा फायदा राज्य शासनाला त्यांचे शेतीविषयक धोरण ठरविण्यात मोठा उपयोग होईल, तसेच कृषी उद्योग तसेच शेतकºयांनाही अहवाल अतिउपयुक्त ठरेल, असेही त्यांनी नमूद केले. चर्चासत्राचे उद्घाटन नीती आयोगाचे सदस्य डॉ. रमेश चंद करणार आहे. यावेळी अध्यक्षस्थानी पद्मभूषण डॉ. आर. एस. परोडा व चारही कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंची उपस्थिती राहणार आहे. वाल्मी येथे १२ सत्रात प्रत्येक विषयावर सखोल विचारमंथन होणार आहे. शास्त्रज्ञांसाठी प्रदर्शनही भरविण्यात येणार आहे.
या प्रदर्शनात शेतकºयांसाठी एक चर्चासत्र आयोजित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी वाल्मीचे महासंचालक एच. के. गोसावी आदींची उपस्थिती होती.

Web Title:  Brainstorm on global climate change tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.