मतदार नोंदणीसाठी राजकीय पक्षांत चढाओढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 09:03 PM2018-10-27T21:03:31+5:302018-10-27T21:06:38+5:30
वाळूज महानगर : परिसरात नवीन मतदार नोंदणीसाठी सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांत चढाओढ सुरू आहे. ठिकठिकाणी शिबिराचे आयोजन करून नावनोंदणीसाठी मतदारांत जनजागृती केली जात असल्याचे चित्र औद्योगिकनगरीत पाहावयास मिळत आहे.
वाळूज महानगर : परिसरात नवीन मतदार नोंदणीसाठी सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांत चढाओढ सुरू आहे. ठिकठिकाणी शिबिराचे आयोजन करून नावनोंदणीसाठी मतदारांत जनजागृती केली जात असल्याचे चित्र औद्योगिकनगरीत पाहावयास मिळत आहे.
वाळूज औद्योगिकनगरीत देशभरातून मोठ्या प्रमाणात कामगार या परिसरात स्थायिक झाले आहेत. दहा ते पंधरा वर्षांपासून या परिसरात वास्तव्यास असणाऱ्या अनेकांची नावे मतदान यादीत समाविष्ट नसल्याने त्यांना मतदानाचा हक्क बजावता येत नाही.
पदाधिकारी व कार्यकर्ते वॉर्डा-वॉर्डात तसेच नागरी वसाहतीत सर्वेक्षण करून मतदार नोंदणीसाठी जनजागृती करताना दिसून येत आहे. निवडणूक आयोगाच्या वतीने १ सप्टेंबरपासून मतदार नोंदणी अभियान सुरू केले असून, ३१ आॅक्टोबरपर्यंत ते सुरु राहणार आहे. १ जानेवारी २०१९ ला वयाची १८ वर्षे पूर्ण करणाºया तरुण-तरुणींची नावे मतदार यादीत समाविष्ट केली आहेत.
याचबरोबर नावात चुका झालेल्या दुरुस्त करणे, मतदार यादीतील पत्त्यात बदल करणे, मृत मतदारांची नावे वगळणे, स्थलांतरितांची नावे वगळणे, दोन ठिकाणी नावे असलेल्यांचे नाव एका यादीतून वगळणे आदी कामे बीएलओकडून केले जात आहे.
मतदार नोंदणीसाठी चढाओढ
काँग्रेस, राष्टÑवादी, शिवसेना, भाजप या प्रमुख राजकीय पक्षांसह इतर पक्षांच्या पदाधिकाºयांनी कार्यकर्ते व पदाधिकाºयांमार्फ त मतदार नोंदणी शिबीर घेण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे बजाजनगर, रांजणगाव, सिडको वाळूज महानगर, पंढरपूर, साऊथ सिटी, वाळूज आदी ठिकाणी मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
----------------------