'द किंग ऑफ पॉप'; ब्राझिलियन पॉपस्टार गिलबर्टो गिल अजिंठा-वेरूळच्या पर्यटनावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 10:27 AM2019-09-23T10:27:42+5:302019-09-23T10:30:20+5:30
भारतीय पद्धतीच्या स्वागताने भारावले
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : पर्यटनाचा शाही आनंद देणारी डेक्कन ओडीसी रेल्वे गुरुवारी औरंगाबादेत दाखल झाली. पर्यटनाच्या या शाही रेल्वेने ब्राझीलचे विख्यात गायक गिलबर्टो गिल आले आहेत.
गिलबर्टो गिल ब्राझिलचे प्रसिद्ध गायक आहेत आणि विश्व स्तरावर त्यांनी अनेक पारितोषिक मिळवली आहेत. ते ब्राझिलचे संस्कृती मंत्री पदावरही कार्यरत होते. संगीतासाठी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. गिलबर्टो गिल हे ब्राझीलच्या संगीताची खरी ओळख आहे, असे म्हटले जाते. गिल यांच्यासह २२ पर्यटक आले असून, या पर्यटकांचे रेल्वेस्थानकावर दिलीप खंडेराय यांच्या कलापथकातर्फेतर्फे पारंपारिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. या स्वागताने ते भा रावून गेले.
यावेळी टुरिझम प्रमोटर्स गिल्ड औरंगाबादचे जसवंतसिंग यांची उपस्थिती होती . गिल आणि पर्यटक वेरूळ लेणी पाहण्यासाठी रवाना झाले.