फटाका मार्के टला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 01:11 AM2017-09-07T01:11:20+5:302017-09-07T01:11:20+5:30

जिल्हा परिषद मैदानावरील फटाका मार्के टला यंदा ब्रेक लागणार आहे. कारण जि. प. प्रशासनाने यंदा ते मैदान फटाका मार्केटला भाड्याने न देण्याचा निर्णय घेतला आहे

Break to crackers market | फटाका मार्के टला ब्रेक

फटाका मार्के टला ब्रेक

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : जिल्हा परिषद मैदानावरील फटाका मार्के टला यंदा ब्रेक लागणार आहे. कारण जि. प. प्रशासनाने यंदा ते मैदान फटाका मार्केटला भाड्याने न देण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेने गेल्या आठवड्यात जि. प. ला पत्र पाठवून मैदान फटाका किंवा इतर स्फोटकांच्या विक्रीला देण्यात येऊ नये, असे पत्र दिले आहे. त्या पत्राआधारे आणि मागील वर्षीच्या घटनेमुळे ते मैदान यंदा रिक्त राहणार आहे. बाजार भरविण्यासाठी दुसºया जागेचा पर्याय अजून तरी पुढे आलेला नाही.
५ लाख रुपयांचा महसूल जि. प. प्रशासनाला मैदान भाड्यातून मिळणे अपेक्षित होते; परंतु मागील वर्षी फटाका बाजाराला लागलेली आग आणि यंदा पालिकेने पत्र देऊन केलेला विरोध यामुळे जि. प. ने त्या महसुलाचा विचार न करता शहराच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे.
२९ नोव्हेंबर २०१६ रोजी सकाळी ११ वा.४० मिनिटांनी जि. प. मैदानावरील फटाका मार्केटला आग लागली होती. आगीत १४८ दुकाने भस्म झाली होती. ८८ दुचाकी, १३ चारचाकी जळून खाक झाल्या होत्या. १० कोटी रुपयांच्या नुकसानीचा अंदाज गेल्यावर्षी लावण्यात आला होता. नियम डावलून फटाका असोसिएशनने दुकानांचे वाटप केले होते.
असोसिएशनने निष्काळजीपणा करून नफेखोरीकडे लक्ष केंद्रित केल्याचा ठपका ठेवत फटाका व्यापाºयांवर गुन्हा दाखल केला होता. तसेच जिल्हा प्रशासनाने अप्पर जिल्हाधिकाºयांकडे याप्रकरणी चौकशी करण्याची जबाबदारी दिली होती. पोलिसांनी सिगारेटमुळे मार्केटला आग लागल्याचे स्पष्टीकरण दिले होते. प्रत्येक दुकानदाराचे पंचनामे केल्यानंतर नुकसानभरपाई देण्याबाबत आजवर कुठलीही कार्यवाही झालेली नाही.

Web Title: Break to crackers market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.