सीताफळे पिकलीच नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 12:41 AM2017-10-14T00:41:57+5:302017-10-14T00:41:57+5:30
विभागीय आयुक्तालय, एमटीडीसी, कृषी विभागाच्या सौजन्याने १३ ते १५ आॅक्टोबरदरम्यान होणाºया सीताफळ महोत्सवाला समन्वयाअभावी अचानक ब्रेक लागला आहे
विकास राऊत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : विभागीय आयुक्तालय, एमटीडीसी, कृषी विभागाच्या सौजन्याने १३ ते १५ आॅक्टोबरदरम्यान होणाºया सीताफळ महोत्सवाला समन्वयाअभावी अचानक ब्रेक लागला आहे. महोत्सवासाठी सीताफळे पिकलीच नाहीत, असे हास्यास्पद कारण सांगून दिवाळीनंतर महोत्सवाची तारीख २७ ते २८ आॅक्टोबर करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. फू्रटमार्केटमध्ये पाहिजे तेवढी सीताफळे उपलब्ध असताना महोत्सवासाठी सीताफळे उपलब्ध होऊ शकली नसल्याचे कारण काही पचनी पडलेले नाही. मुळात दिवाळीमुळे हा महोत्सव पुढे ढकलण्यात आल्याची चर्चा आहे.
एमटीडीसीने कलाग्राम सीताफळ महोत्सवासाठी आरक्षित करून ठेवले होते. महोत्सव होणार की नाही, स्टॉल कुणाला दिले, याबाबतचे सर्व नियोजन कृषी सहसंचालक एस.के. दिवेकर यांच्याकडे होते. महोत्सव लांबणीवर टाकण्याचे कारण म्हणजे गुणवत्तेची फळे बाजारात नाहीत. शेतक-यांची तयारी नव्हती. त्यामुळे महोत्सव पुढे ढकलण्यात आला, असे सांगण्यात येत आहे.
नांदेड, लातूर, बीड भागातील शेतक-यांसह शास्त्रज्ञांशी याप्रकरणी चर्चा केली असता त्यांच्याकडून नकार मिळाला. काही जणांना महोत्सव होणार असल्याचे माहिती झाल्याने त्यांनी कलाग्राम गाठले होते; परंतु त्यांना महोत्सवाची तारीख पुढे ढकलल्याचे ऐनवेळी समजल्यामुळे त्यांना परत जावे लागले. या महोत्सवात नेमकी समन्वयाची भूमिका कुणावर होती. तारीख पुढे ढकलल्याचे ऐनवेळी जाहीर का करावे लागले, हे सांगण्यास कोणतीही प्रशासकीय यंत्रणा पुढे न आल्यामुळे शेतक-यांची तारांबळ उडाली. विशेष म्हणजे महोत्सव पुढे ढकलल्याचे साधे प्रसिद्धीपत्रकही आयोजकांनी काढले नाही. एमटीडीसीचे प्रादेशिक अधिकारी अण्णासाहेब शिंदे म्हणाले, कृषी विभागाकडे कलाग्राममधील स्टॉल दिले होते. चांगल्या गुणवत्तेची फळे महोत्सवासाठी मिळालेली नाहीत. शेतकºयांची तयारी झालेली नाही, म्हणून महोत्सव पुढे ढकलल्याचे समजले आहे. सहसंचालक दिवेकर म्हणाले, महोत्सव पुढे ढकलण्याबाबत चर्चा झाली होती. काही अधिकारी सुटीवर होते. ते रुजू झाले, त्यांनी विभागीय प्रशासनाशी समन्वय साधून तारखेबाबत चर्चा केली. तयारीसाठी कमी दिवस असल्यामुळे महोत्सव पुढे ढकलण्याबाबत चर्चा झाली. शेतक-यांची तयारी नाही, पिकलेली फळे नाहीत, असा काही मुद्दा नव्हता. विभागीय प्रशासन, एमटीडीसी, कृषी विभाग यांच्यात गेल्या आठवड्यात या महोत्सवाबाबत बैठक होऊनही त्याचे वेळेत नियोजन करता न आल्याने आॅक्टोबरअखेर होणारा महोत्सव खरचं होईल का, याबाबत शंका आहे.