काेकणातील वारे मंदावल्यामुळे पावसाला ब्रेक; तापमान कमी, दमट वातावरणामुळे घामाच्या धारा

By विकास राऊत | Published: June 19, 2024 06:26 PM2024-06-19T18:26:15+5:302024-06-19T18:26:24+5:30

तापमान वाढत असून, हवेतील आर्द्रता ६० टक्क्यांवर गेली आहे. त्यामुळे वातावरण दमट झाले आहे

Break in rains as winds in Kokan slow down; Sweat due to low temperature, humid environment | काेकणातील वारे मंदावल्यामुळे पावसाला ब्रेक; तापमान कमी, दमट वातावरणामुळे घामाच्या धारा

काेकणातील वारे मंदावल्यामुळे पावसाला ब्रेक; तापमान कमी, दमट वातावरणामुळे घामाच्या धारा

छत्रपती संभाजीनगर : राज्यात मान्सूनचे आगमन झाले असून, सर्व भागांत कमी-अधिक पाऊस होत आहे. मात्र, मराठवाड्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. कोकणातील वाऱ्यांचा वेग मंदावल्यामुळे पावसाने ब्रेक घेतला आहे. तापमान वाढत असून, हवेतील आर्द्रता ६० टक्क्यांवर गेली आहे. त्यामुळे वातावरण दमट झाले असून, जनसामान्य घामाघूम होत आहेत.

जिल्ह्यात १५ जून रोजी सकाळपर्यंत १०.९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. आजवर १४५.३ मि.मी. पाऊस जिल्ह्यात झाल्याचे आकडे सांगत आहेत. असे असले तरी जिल्ह्यातील लघु, मध्यम व मोठ्या प्रकल्पांत पुरेसा पाणीसाठा निर्माण झालेला नाही. जिल्ह्याची वार्षिक सरासरी ५८१.७ मि.मी. आहे.

जिल्ह्यात आजवर झालेला पाऊस
तालुका.........................पाऊस
छत्रपती संभाजीनगर........१३९ मि.मी
पैठण.................१६८ मि.मी.
गंगापूर..............१३८ मि.मी.
वैजापूर...............१२३ मि.मी.
कन्नड..............१५६ मि.मी.
खुलताबाद............१६१ मि.मी.
सिल्लोड ............१३७ मि.मी.
सोयगाव.............१२६ मि.मी.
फुलंब्री..............१८० मि.मी.
एकूण.........१४५.३ मि.मी.

वाऱ्याचा वेग मंदावला
कोकणातून येणाऱ्या वाऱ्याचा वेग मंदावल्यामुळे छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यात पावसाने ब्रेक घेतला आहे. पुढील दोन ते तीन दिवस पाऊस कमी राहील. परिणामी, तापमान वाढत आहे. हवेतील आर्द्रता ६० टक्क्यांवर गेल्यामुळे दुपारी पाऊस येईल, अशी चिन्हे होती; परंतु वाऱ्याचा वेग कमी असल्याने पाऊस आला नाही. कमाल तापमान ३६, तर किमान तापमान २९.८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.
- श्रीनिवास औंधकर, हवामान अभ्यासक

Web Title: Break in rains as winds in Kokan slow down; Sweat due to low temperature, humid environment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.