धोंड्याच्या वारीने गर्दीचा विक्रम मोडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 08:49 PM2018-05-25T20:49:31+5:302018-05-25T20:49:58+5:30

कमला एकादशी : गोदास्नानानंतर लाखो भाविकांनी घेतले नाथांचे दर्शन; मोठ्या प्रमाणावर दानधर्म

 Break the record of crowds with a stone vane | धोंड्याच्या वारीने गर्दीचा विक्रम मोडला

धोंड्याच्या वारीने गर्दीचा विक्रम मोडला

googlenewsNext

पैठण : अधिक महिन्यात आलेल्या कमला एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व असल्याने शुक्रवारी लाखो भाविकांनी पैठणनगरीत हजेरी लावली. धोंड्याच्या वारीतील गर्दीचा विक्रम आज मोडीत निघाला. गोदेच्या पवित्र स्नानासाठी भाविकांनी केलेल्या गर्दीने गोदावरीचे जवळपास सर्वच घाट भाविकांनी फुलून गेले होते. दिवसभरात दोन लाखांपेक्षा अधिक भाविकांनी दर्शन घेतल्याचा अंदाज नाथ संस्थानच्या वतीने व्यक्त करण्यात आला. भाविकांच्या गर्दीचा अंदाज चुकल्याने सर्वच यंत्रणेवर दिवसभर ताण जाणवत होता.
या एकादशीच्या मुहूर्तावर गंगास्नान, बत्ताशे व अनारसे दान, दिपदानास विशेष महत्व असल्याचे अनंत खरे, समीर शुक्ल यांनी सांगितले. आज पहाटेपासूनच भाविकांचे पैठणमध्ये आगमन सुरू झाले. गोदावरीनदीच्या कृष्णकमल व मोक्ष घाटावर स्नानासाठी महिला भाविकांचीही मोठी गर्दी झाली. यामुळे घाटावरील व्यवस्था अपुरी पडली. गोदास्नानासाठी सुध्दा भाविकांना प्रतिक्षा करावी लागली. गोदेचे स्नान करून नाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन वारकरी परत जात होते. आजची वारी धोंड्याची वारी म्हणून प्रसिद्ध आहे. यासाठी लाखो भाविक आज दिंड्या घेऊन ‘भानुदास एकनाथ’चा गजर करीत नाथनगरीत दाखल झाल.
गर्दीमुळे सर्व यंत्रणांचे व्यवस्थापन कोलमडले
भाविकांनी एकच गर्दी केल्याने सर्व यंत्रणांचे व्यवस्थापन वारंवार कोलमडून पडले. शहरात वारंवार वाहतूक ठप्प होत होती. बसस्थानकावरही बस गाठण्यासाठी व आलेल्या बसला स्थानकात जागा मिळण्यासाठी संघर्ष करावा लागत होता. शहरात येणारे सर्वच रस्ते हाऊसफूल झाल्याने मोठी तारांबळ उडत होती. पोलीस निरीक्षक चंदन इमले, सहायक पोलीस निरीक्षक एस.के. वारे हे दिवसभर फिरून कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करीत होते.
नाथषष्ठीच्या वातावरणाची पुन्हा एकदा अनुभूती
शहरातील सर्व धर्मशाळा, मठ व मंदिरे भाविकांच्या उपस्थितीने खचाखच भरली होती. दिवसभर ‘भानुदास एकनाथ’चा गजर करीत दिंड्यांसह वारकºयांचे आगमन सुरू होते. रात्रभर मठात, मंदिरात थांबलेल्या वारकºयांचे कीर्तन, प्रवचनाचे स्वर निनादत होते. हरिनामाच्या गजराने पैठणनगरी निनादून गेली. नाथषष्ठीच्या वातावरणाची पुन्हा एकदा पैठणकरांना अनुभूती आली. आज आलेल्या भाविकात महिलांची संख्या लक्षणीय होती. एकूण भाविकांच्या ७० टक्के महिला होत्या. महिलांनी विष्णूला प्रिय असलेले बत्तासे अर्पण करून दान धर्म केला.
पाकिटमारांची चांदी
मंदिर परिसरातील गर्दी व श्रध्देने आलेल्या महिला भाविकांना चोरट्यांनी चांगलाच फटका दिला. भाविकांच्या पाकीटांवर चोरट्यांनी डल्ला मारला.

Web Title:  Break the record of crowds with a stone vane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.