एस.टी.चा ब्रेक फेल; अपघातात दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 01:54 AM2017-10-17T01:54:49+5:302017-10-17T01:54:49+5:30

प्रवासी घेऊन बीडला निघालेल्या एस.टी. बसचे अचानक ब्रेक फेल झाल्याने वेगातील बसने तीन रिक्षा, एक दुचाकी आणि कारला जोरदार धडक दिली. बसच्या धडकेने दुचाकीवरील दोघे जण जागीच ठार झाले तर ़रिक्षाचालकांसह तीन जण जखमी झाले.

Breaks faileed of ST; 2 killed in accident | एस.टी.चा ब्रेक फेल; अपघातात दोन ठार

एस.टी.चा ब्रेक फेल; अपघातात दोन ठार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : प्रवासी घेऊन बीडला निघालेल्या एस.टी. बसचे अचानक ब्रेक फेल झाल्याने वेगातील बसने तीन रिक्षा, एक दुचाकी आणि कारला जोरदार धडक दिली. बसच्या धडकेने दुचाकीवरील दोघे जण जागीच ठार झाले तर ़रिक्षाचालकांसह तीन जण जखमी झाले. ही भीषण दुर्घटना सोमवारी सायंकाळी सव्वाचार वाजेच्या सुमारास सिडकोतील वसंतराव नाईक चौकात घडली.
संजय म्हसूजी जाधव (४०, रा. बेगमपुरा) आणि बालाजी गणपत ढंगारे (४०, रा. सनी सेंटर, पळशी रोड) अशी मरण पावलेल्या व्यक्तींची नावे आहेत. संजय दशरथ शिरसाट (४0, रा. जय भवानीनगर, रेवणनाथ भागिनाथ नरवडे (३२, रा. चिकलठाणा), नगमा उमी हाजी (२0, रा. टाऊनहॉल) अशी जखमींची नावे आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
बसचे ब्रेक निकामीच
हा अपघात ब्रेक निकामी झाल्याने झाल्याचे बोलले जात होते. यावेळी बसमध्ये अडकलेली रिक्षा काढण्यासाठी पोलिसांनी खाजगी बसचा चालक दत्ता नागरे यांची मदत घेतली. यावेळी त्यांनी बस मागे-पुढे घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा बसला ब्रेकच नसल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी ही बाब पोलिसांना ठामपणे सांगितली.

Web Title: Breaks faileed of ST; 2 killed in accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.