‘आघाडी’त बिघाडी; ‘घडी’ बसली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 01:00 AM2017-08-04T01:00:25+5:302017-08-04T01:00:25+5:30

: बीड नगरपालिकेतील राजकारणाने आता वेगळेच स्वरूप प्राप्त केले आहे. एमआयएम स्वतंत्र गटाच्या पाच नगरसेवकांनी आघाडीला सोडचिठ्ठी देत विकासाच्या नावाखाली नगराध्यक्षांसोबत हात मिळविल्याने विस्कटलेली ‘घडी’ पुन्हा बसली आहे

 Breakthrough in 'NCP'; 'Watch' was sitting! | ‘आघाडी’त बिघाडी; ‘घडी’ बसली !

‘आघाडी’त बिघाडी; ‘घडी’ बसली !

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : बीड नगरपालिकेतील राजकारणाने आता वेगळेच स्वरूप प्राप्त केले आहे. एमआयएम स्वतंत्र गटाच्या पाच नगरसेवकांनी आघाडीला सोडचिठ्ठी देत विकासाच्या नावाखाली नगराध्यक्षांसोबत हात मिळविल्याने विस्कटलेली ‘घडी’ पुन्हा बसली आहे. या बदलामुळे पालिकेतील राजकारणाचे वेगळे चित्र लवकरच स्पष्ट होईल.
बीड नगरपालिकेत नगराध्यक्षांसह ५१ नगरसेवक आहेत. यामध्ये काकू-नाना आघाडीचे २०, राष्ट्रवादीचे १८, एमआयएम ९, शिवसेना २, तर भाजपच्या एका नगरसेवकाचा समावेश आहे. सत्ता स्थापनेसाठी आघाडीने एमआयएम स्वतंत्र गटाच्या सात नगरसेवकांची मदत घेतली. त्यानंतर उपनगराध्यक्षासह सभापतीपदे आपल्या ताब्यात घेतली; परंतु नगराध्यक्षांच्या स्वाक्षरीमुळे आघाडीला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. काकू-नाना आघाडीचे नेते संदीप क्षीरसागर यांचे बंधू उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांचा व काका तथा नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्यात गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप होत होते. या दोघांच्या वादात शहराचा विकास खुंटल्याचा प्रतिक्रिया सर्वसामान्यांतून व्यक्त होत आहेत.
दरम्यान, मागील तीन दिवसांपासून पालिकेतील राजकारण वेगवेगळ्या चर्चेने ढवळून निघाले आहे. अखेर बुधवारी रात्री एमआयएम स्वतंत्र गटाच्या शेख मोहंमद खालेद, शेख जफर सुलताना बशीर, मोमीम अजरोद्दीन, अहेमद नफिसा खातून, रूखय्या बेगम नसीरोद्दीन या पाच नगरसेवकांनी आघाडीला सोडचिठ्ठी देऊन डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्यासोबत विकासाच्या नावाखाली हात मिळवणी केली. या पाच नगरसेवकांनी त्यांचा स्वतंत्र गट स्थापन करून जिल्हा प्रशासनाला पत्र दिले आहे.



शिवसेनेने उर्दू फलक हटवला
बीड : जिल्हाधिकारी यांनी बोलावलेल्या विशेष सभेत ठराव घेऊन पालिकेच्या इमारतीवर नगर परिषद नावाचा उर्दू फलक काकू-नाना आघाडी व एमआयएमच्या नगरसेवकांनी लावला होता. त्यानंतर शिवसेना आक्रमक झाली. बुधवारी जिल्हा प्रमुख अनिल जगताप यांनी फलकाबद्दल संताप व्यक्त केला होता. गुरुवारी दुपारी शिवसेनेचे कार्यकर्ते नगरपालिकेत दाखल झाले. यावेळी मुख्याधिकारी डॉ. धनंजय जावळीकर यांच्या सोबत चर्चा करून फलक हटविण्याची मागणी केली. याच दरम्यान शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी पालिका इमारतीच्या दुसºया मजल्यावर जाऊन, बल्ब, ट्यूबची तोडफोड करून इमारतीवरील फलक काढून टाकला.
पालिकेतील राडा पाहून तात्काळ पोलिसांना पाचारण करण्यात आले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, पोलीस उपनिरीक्षक घनशाम पाळवदे, सुलेमान सय्यद यांच्यासह फौजफाटा पालिकेत दाखल झाला. परिस्थिती पाहून सायंकाळपर्यंत दंगल नियंत्रण पथक बंदोबस्तासाठी तैनात होते. सायंकाळपर्यंत पोलीस ठाण्यात नोंद झालेली नव्हती.
याबाबत मुख्याधिकारी डॉ. धनंजय जावळीकर म्हणाले, हा फलक पालिकेने लावलेला नव्हता; परंतु पालिका हद्दीत येऊन सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्या प्रकरणी कारवाई केली जाणार आहे.
शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल जगताप म्हणाले, राष्ट्रीय भाषा हिंदी आणि राज्यभाषा मराठी असताना अचानक उर्दू भाषा आली कुठून? आणि या भाषेचा फलक नगर परिषदेवर लावण्याचा अट्टहास का, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. जगताप यांनी पालिकेतील राजकारणावर कडाडून टीका करीत मुख्याधिकाºयांना निवेदन दिले.

Web Title:  Breakthrough in 'NCP'; 'Watch' was sitting!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.