संस्थेवरील कारवाई टाळण्यासाठी २० हजाराची लाच; सहकार अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2021 07:55 PM2021-02-02T19:55:25+5:302021-02-02T20:00:57+5:30

Bribe Case Aurangabad संस्थेवरील कारवाई टाळून त्यावर प्रशासक न नेमण्यासाठी २० हजार रुपये लाच मागितली.

Bribe of Rs 20,000 to avoid action against the organization; Co-operation officer in ACB's custody | संस्थेवरील कारवाई टाळण्यासाठी २० हजाराची लाच; सहकार अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

संस्थेवरील कारवाई टाळण्यासाठी २० हजाराची लाच; सहकार अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

googlenewsNext

औरंगाबाद: सहकारी मत्स विकास संस्थेविरुध्द कारवाई न करण्यासाठी २० हजार रुपये लाच घेताना सहकार अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. ही कारवाई श्रीनिकेतन कॉलनीच्या रस्त्यावर करण्यात आली.

वाल्मीक माधवराव काळे (५६) असे लाचखोर सहकार अधिकाऱ्याचे नाव आहे. तक्रारदार यांच्या मत्स व्यवसाय सहकारी संस्था आहे. या संस्थेविरूध्द अनेक तक्रारी मत्स आणि दुग्ध विकास कार्यालयास प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारीनुसार संस्थेची चौकशी सहकार अधिकारी काळे करीत होते. यामुळे तक्रारदार यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी काळे यांनी संस्थेवरील कारवाई टाळून त्यावर प्रशासक न नेमण्यासाठी २० हजार रुपये लाच मागितली. तक्रारदार यांची लाच देण्याची इछा नसल्याने त्यांनी काळेविरुध्द लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. 

पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, अप्पर अधीक्षक डॉ. अनिता जमादार उपअधीक्षक बी व्ही गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप राजपूत, कर्मचारी अरुण उगले,दिगंबर पाठक आणि प्रकाश घुगरे यांनी लाचेच्या मागणीची पडताळणी केली. यानंतर आज दुपारी काळे ला पकडण्यासाठी  श्रीनिकेतन कॉलनी येथे सापळा रचला. यावेळी तक्रारदाराकडुन २० हजार रुपये लाच घेतांच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी काळेला रंगेहाथ पकडले. याविषयी क्रांतीचौक ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

Web Title: Bribe of Rs 20,000 to avoid action against the organization; Co-operation officer in ACB's custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.