स्मार्ट फोनच्या आमिषाने 'त्याने' बोगस नियुक्तीपत्रावर केल्या अधिष्ठांतांच्या बनावट सह्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 05:21 PM2017-10-30T17:21:08+5:302017-10-30T17:24:11+5:30

घाटी रुग्णालयात नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगारांकडून लाखो रुपये उकळत बोगस नियुक्तीपत्रावर अधिष्ठातांची बनावट स्वाक्षरी करणा-या एका उच्च शिक्षित आरोपीला आर्थिक गुन्हेशाखा पोलिसांनी अटक केली.

The bribe of smart phones has made the fake associates with the bogus appointment letter | स्मार्ट फोनच्या आमिषाने 'त्याने' बोगस नियुक्तीपत्रावर केल्या अधिष्ठांतांच्या बनावट सह्या 

स्मार्ट फोनच्या आमिषाने 'त्याने' बोगस नियुक्तीपत्रावर केल्या अधिष्ठांतांच्या बनावट सह्या 

googlenewsNext
ठळक मुद्देघाटी रुग्णालय बोगस नोकरभरती प्रकरण, बनावट स्वाक्षरी करणा-या एका उच्च शिक्षित आरोपीला आर्थिक गुन्हेशाखा पोलिसांनी अटक केली. पोहालने बोगस नियुक्तीपत्र देऊन १७ जणांकडून लाटले ६८ लाख

औरंगाबाद : घाटी रुग्णालयात नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगारांकडून लाखो रुपये उकळत बोगस नियुक्तीपत्रावर अधिष्ठातांची बनावट स्वाक्षरी करणा-या एका उच्च शिक्षित आरोपीला आर्थिक गुन्हेशाखा पोलिसांनी अटक केली. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी बनावट नियुक्तीपत्र तयार करणारा राजेंद्र पोहाल याआधीच पोलिसांच्या ताब्यात आहे.

सुनील बन्सीलाल डोणगांवकर उर्फ गजहास(४३,रा. भीमनगर,भावसिंगपुरा) असे  आरोपीचे नाव आहे. त्याचे शिक्षण एम.एस्सीपर्यंत झालेले आहे. आर्थिक गुन्हेशाखा पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार किशोर चंद्रभान देहाडे आणि इतर बारा जणांना घाटीत कनिष्ठ लिपीक आणि शिपाई पदावर नोकरी लावण्याचे अमिष दाखवून राजेंद्र पोहाल याने प्रत्येकी दोन लाख रुपये याप्रमाणे २४ लाख रुपये उकळले. २०१४ मध्ये पैशाचा व्यवहार झाल्यानंतर आरोपीने दोन वर्ष त्यांना फिरवले. नंतर तक्रारदारांसह अन्य लोकांना त्याने बोगस नियुक्तीपत्रे दिली. 

यावेळी त्याने ५० लिपीक आणि ४८ शिपाई पदांची निवड यादी त्यांना दाखविली. नियुक्तीपत्रे खरे असल्याचे भासविण्यासाठी आरोपीने त्यावर अधिष्ठातांच्या सह्या आणि शिक्का मारलेला होता. याप्रकरणी तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी पोहाल यास अटक केली. पोलीस कोठडीत त्याची चौकशी केली असता त्याने तक्रारदारांना दिलेल्या नियुक्तीपत्रावर अधिष्ठातांच्या सह्या सुनील डोणगावकर याने मारल्याची कबुली दिली. त्याच्या जबाबानंतर पोलिसांनी २९आॅक्टोबर रोजी रात्री पोलिसांनी सुनीलला राहत्या घरातून अटक केली. तो उच्चशिक्षित असून त्याला नोकरी नाही. तो एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करतो. 

डीटीपी सेंटरवर बनवले बोगस नियुक्तीपत्रे
पोहाल हा नियमित लक्ष्मीनगरातील एका डीटीपी सेंटरवर ये-जा करीत असे. तेथे त्याची ओळख सुनीलसोबत झाली होती. तेथेच त्याने बोगस नियुक्तीपत्रे तयार केली. या नियुक्तीपत्रावर अधिष्ठातांच्या सह्या करण्याचे काम त्याने आरोपी सुनील याच्याकडून करून घेतल्या. त्यासाठी त्याला पोहालने काही रक्कमही दिली. यासोबतच पोहल याने सुनीलला एक मोबाईल हॅण्डसेट देणार होता. मोबाईलच्या अमिषाने सह्या केल्याची कबुली त्याने दिल्याची माहिती तपास अधिकारी पोहेकाँ अरूण वाघ यांनी सांगितले.
 

Web Title: The bribe of smart phones has made the fake associates with the bogus appointment letter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.