लाचखोर कनिष्ठ लेखाधिकाºयाला पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 12:15 AM2017-09-28T00:15:32+5:302017-09-28T00:15:32+5:30
मयत पतीचे वैद्यकीय बिल मंजूर करुन देण्यासाठी दोन हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणाºया पशूसंवर्धन विभागातील कनिष्ठ लेखाधिकाºयाला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने बुधवारी पकडले़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : मयत पतीचे वैद्यकीय बिल मंजूर करुन देण्यासाठी दोन हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणाºया पशूसंवर्धन विभागातील कनिष्ठ लेखाधिकाºयाला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने बुधवारी पकडले़
जिल्हा परिषदेच्या पशूसंवर्धन विभागात कार्यरत असलेल्या पतीचे निधन झाल्यानंतर पत्नीने वैद्यकीय बिलाची ४ लाख १५ हजार २३४ रपयांचे बिले मंजूर करण्यासाठी कनिष्ठ लेखाधिकारी उज्ज्वला ब्रम्हाजी गजभारे यांनी चार हजार रुपयांची लाच मागितली होती़ याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली़ पंचासमक्ष झालेल्या पडताळणीत गजभारे यांनी लाच मागितल्याचे स्पष्ट झाले़ तडजोडीअंती दोन हजार रुपये देण्याचे ठरले़ त्यानुसार बुधवारी जिल्हा परिषद कार्यालयात सापळा रचला होता़