लाचखोर तलाठी एसीबीच्या जाळ्यात
By Admin | Published: March 15, 2016 12:15 AM2016-03-15T00:15:14+5:302016-03-15T01:05:42+5:30
सोनकपिंपळगाव : अंबड तालुक्यातील झिरपी येथील तलाठ्यास ९०० रूपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी दुपारी पकडले.
सोनकपिंपळगाव : अंबड तालुक्यातील झिरपी येथील तलाठ्यास ९०० रूपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी दुपारी पकडले.
झिरपी येथील एका शेतकऱ्याची गट क्रमांक चारमध्ये ८ हेक्टर ४९ आर जमीन आहे. संबंधित शेतकऱ्यास सातबारा उताऱ्यावर विहिरीची नोंद घ्यावयाची होती. यासाठी तलाठी तमशेटे यांनी बाराशे रूपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती ९०० रूपये देण्याचे तलाठ्याने सांगितले. मात्र, शेतकऱ्याची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार सोमवारी दुपारी सापळा लावण्यात आला. नूतन वसाहत भागातील कामकाजाच्या खोलीत लाच घेतल्याचे निष्पन्न झाले. ही कारवाई उपअधीक्षक प्रवीण मोरे, पोलिस निरीक्षक व्ही.बी.चिंचोले, व्ही. एल. चव्हाण, किशोर पाटील, अमोल आगलावे, नंदू शेंडीवाले, प्रदीप दौंडे, संजय उदगीरकर, रामचंद्र कुदर, प्रदीप उबाळे, महेंद्र सोनवणे आदींनी केली. (वार्ताहर)