अजिंठा-बुलढाणा रस्त्यावरील पूल गेला वाहून; शेतीचे अतोनात नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 07:06 PM2019-07-03T19:06:47+5:302019-07-03T19:08:43+5:30
56 मिलीमीटर पाऊस झाल्याने शिवना सर्कल मधील शेती उध्वस्त
सिल्लोड (औरंगाबाद ) : तालुक्यातील अजिंठा शिवना सर्कल मध्ये 56 मिलीमीटर पाऊस झाला. पाण्याच्या प्रवाहाने अजिंठा-बुलढाणा रस्त्यावरील मादणी येथील पूल वाहून गेला. यामुळे रस्त्यावरील सर्व वाहतूक ठप्प झाली आहे.
अजिंठा, बुलढाणा जाण्यासाठी नाटवी, वङाळी, धावङा, व शिवना अनवा, पारध, धाड़ या मार्गाने वाहने जात आहे. या सर्कल मधील सर्वच शेत जमीन पाण्याखाली गेल्याने पेरलेले सर्वच पीके नेस्तनाबूद झाली आहेत .यामुळे शेतकऱ्यावर आसमानी संकट आले आहे.
पुरात अडकलेल्या कुटुंबाची ३ तासानंतर सुटका...
शिवना येथील अजिंठा बुलढाणा राज्य रस्त्यावरील शेतवस्तीवर वास्तव्यास असलेले जगताप कुटुंबीय मंगळवारी शेतात चॊहोबाजूंनी साचलेल्या पाण्यात अडकले होते. रात्री नऊ वाजता पाचही सदस्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. अजिंठा पोलिस व संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी त्यांची सुटका केली.