फुकटात ‘चमकोगिरी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2017 12:34 AM2017-07-02T00:34:21+5:302017-07-02T00:34:51+5:30

बीड : शहराला सध्या गंभीर अशा विविध समस्यांनी विळखा घातला आहे. त्यातच फुकटात चमकोगिरी करणाऱ्यांची भर पडली आहे.

'Brightness' | फुकटात ‘चमकोगिरी’

फुकटात ‘चमकोगिरी’

googlenewsNext

सोमनाथ खताळ ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : शहराला सध्या गंभीर अशा विविध समस्यांनी विळखा घातला आहे. त्यातच फुकटात चमकोगिरी करणाऱ्यांची भर पडली आहे. पालिकेच्या वतीने केवळ १६ ठिकाणी बॅनर लावण्यास परवानगी आहे. परंतु सद्यस्थितीत फुटा-फुटावर दादा, मामा, काका, भैय्या, साहेब, ताई अन् अण्णांचे बॅनर लागल्याचे दिसून येत आहे. यामुळे संपूर्ण शहर विद्रूप झाले आहे.
एकीकडे ‘स्वच्छ शहर, सुंदर शहर-बीड शहर’ असा गवगवा केला जातो. मात्र, प्रत्यक्षात पाहिले तर असे काहीच दिसत नाही. जिकडे तिकडे समस्याच समस्या दिसू लागल्याने सर्वसामान्य नागरिकही याला वैतागले आहेत. या फुकटात चमकोगिरी करणाऱ्यांचा त्रास होत असल्याने सर्व स्तरांतून पालिकेवर टीका होत आहे.
जयश्री विधातेंनी काढले होते बॅनर
तत्कालीन स्वच्छता सभापती तथा विद्यमान नगरसेवक जयश्री विलास विधाते यांनी दीड वर्षांपूर्वी अनधिकृत बॅनर लाऊन चमकोगिरी करणाऱ्यांमध्ये चांगलीच दहशत निर्माण केली होती. दोन दिवस त्यांनी रस्त्यावर उतरून शहरातील सर्व अनधिकृत बॅनर काढले होते. तसेच त्यांच्याविरोधात तक्रार देण्यासाठी नगर रचनाकार यांच्यासोबत पोलीस ठाणेही गाठले होते. यामुळे शहर छान दिसत होते.
रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला होता. परंतु अवघ्या काही महिन्यांत पुन्हा चमकोगिरी करणाऱ्यांनी डोके वर काढले. सध्या तर फुटाफुटावर बॅनर दिसू लागले आहेत. महिला असतानाही त्यांनी एवढी मोठी मोहीम हाती घेतली होती. आता तशी मोहीम हाती घेण्यासाठी कोणीही पुढे धजावत नाही.

Web Title: 'Brightness'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.